Jitendra Birthday
Jitendra Birthday Esakal
मनोरंजन

Jitendra Birthday: अभिनेता जितेंद्र यांचं नातवंडांसोबत बर्थडे सेलिब्रेशन; व्हिडीओ चर्चेत

सकाळ ऑनलाईन

मुंबई : 'जम्पिंग जॅक' या नावाने प्रसिद्ध असलेले ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र यांचा काल म्हणजे ७ एप्रिलला वाढदिवस होता. त्यांनी आपला ८२वा वाढदिवस कुटुंबासमवेत सेलिब्रेट केला. यावेळी त्यांच्या नातवंडांनी मोठी धम्माल केली. या सेलिब्रेशनचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. (Actor Jitendra Birthday celebration with grandchildren video viral)

सोशल मीडियावर जितेंद्र यांचा मुलगा अभिनेता तुषारने वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये जितेंद्र त्यांच्या दोन्ही नातवांसोबत बर्थडे साजरा करताना दिसत आहेत. आजोबांसोबत केक कापताना दोन्ही मुलंही खूप खुश दिसत आहेत. तुषारने या व्हिडिओसह पोस्टमध्ये म्हटलं की, "आम्ही वाढदिवस खूप साधेपणाने साजरा केला त्यामुळं आमच्यावर आज कॅमेरापासून पळण्याची वेळ आली नाही. (Marathi Tajya Batmya)

अनेकांनी या व्हिडिओवर कमेंट करत जितेंद्र यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. जितेंद्र यांनी त्यांच्या नातवांसोबत घालवलेला वेळ, त्यांचा बॉण्ड सगळ्यांनाच खूपच आवडला. या व्हिडिओत त्यांची दोन्ही नातवंडं लक्ष्य आणि रवी खूप खूश दिसत आहेत, अनेकांनी त्यांचंही कमेंट्समध्ये कौतुक केलं आहे. (Latest Marathi News)

जितेंद्र यांची मुलगी एकता कपूर यांची निर्मिती असलेला क्रू सिनेमा सध्या गाजला. तर तुषार मारीच या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. त्यानंतर तुषारने कोणत्याही सिनेमातून काम केलं नाहीये.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघात सकाळी ९ वाजेपर्यंत सरासरी 8 टक्के मतदान

Akshay Kumar: खिलाडी अक्षय कुमारनं भारताचं नागरिकत्व मिळाल्यानंतर पहिल्यांदाच केलं मतदान; म्हणाला, "माझा भारत देश हा..."

Latest Marathi Live News Update: सुनील राऊत पोलिसांवर भडकले

PM Modi : मतपेढीच्या तुष्टीकरणासाठी संस्थांना धमक्या; पंतप्रधानांची ममतांवर टीका

Standing Problems: तुम्हीही जास्त वेळ उभे राहत असाल तर वाढू शकतात 'या' समस्या

SCROLL FOR NEXT