actor milind gawali special post for ayodhya ram mandir aai kuthe kay karte  SAKAL
मनोरंजन

Milind Gawali: "मला आमंत्रण दिलं नाही कारण...", अयोध्या राम मंदिर सोहळ्याबद्दल अभिनेत्याची पोस्ट चर्चेत

मिलिंद गवळींनी राम मंदिर सोहळ्याबद्दल खास पोस्ट लिहीली आहे

Devendra Jadhav

Milind Gawali at Ayodhya Ram Mandir: काल सगळीकडे अयोध्या राम मंदिर सोहळ्याबद्दल उत्साहाचं वातावरण होतं. भारतभरातील कलाकार, राजकीय व्यक्ती आणि बिझनेसमन अयोध्या राम मंदिरात दर्शनासाठी गेले होते.

अशातच 'आई कुठे काय करते' फेम अभिनेता मिलिंद गवळींनी काल झालेल्या अयोध्या राम मंदिर सोहळ्याबद्दल खास पोस्ट लिहीली आहे. शिवाय कालच्या विशेष दिवशी आई कुठे काय करते सेटवर कसं वातावरण होतं याचंही वर्णन केलंय.

मिलिंद गवळींनी मालिकेच्या सेटवरील एक व्हिडीओ पोस्ट केलाय. या व्हिडीओखाली कॅप्शनमध्ये मिलिंद गवळी लिहीतात, "कालचा दिवस फार मंगलमय होता,
काल राम लल्ला अयोध्येत विराजमान झाले,
काल बारा वाजून वीस मिनिटाच्या मुहूर्तावर अयोध्यातील राम मंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा पूर्ण झाले,
पाचशे वर्षाच्या संघर्षानंतर, भारतात हिंदुस्थानात हा दिवस उजाडला,
4000 वेगवेगळ्या पंथाचे साधू संत तीन हजारां हुन अधिक vvip अतिथी, शंभरहून अधिक प्रायव्हेट जेट विमान, विमानांना एवढ्या पार्किंगची सोय नसल्यामुळे वेगळ्या राज्यात विमान पार्क केलेली होती."

मिलिंद गवळी पुढे लिहीतात, "सुपरस्टार्स कलाकार खेळाडू .
कालच्या दिवशी आयोध्येमध्ये आपण पण असायलाच हवं होतंअसं असं मला पण वाटत होतं , पण नंतर विचार केला की मला आमंत्रण दिलं नाही कारण माझ्या घरीच राम आहे . वडिलांचं नाव च “श्रीराम” आहे.
पण अयोध्येत आणि देशात हा उत्सव चालू असताना मी रामासारखं आपण आपलं कर्तव्य करत राहायचं असं ठरवलं. मी माझं काम म्हणजेच सध्या, “आई कुठे काय करते” या मालिकेचे शूटिंग करत होतो , सकाळी सेटवर पोहोचल्यानंतर नमस्कार गुड मॉर्निंग च्या ऐवजी “जय श्रीराम “म्हणत सगळे एकमेकांचं स्वागत करत होते.
आमचे सीन्स पण किती interesting होते बघा, डॉक्टर अभी घर सोडून नोकरी करण्यासाठी कॅनडाला जातो आहे ,
तो परत केव्हा येईल कधी येईल , येईल की नाही याची कोणाला शाश्वती नाही आहे. त्याचा धाकटा भाऊ यश त्याला मिठी मारून ढसाढसा रडतोय,
मग माझ्या ,म्हणजेच अनिरुद्धच्या, म्हणजेच त्याच्या वडिलांच्या पाया पडून निघायला लागतो, आणि मग अनिरुद्ध एक बाप मुलाला मिठी मारून रडतो."

मिलिंद गवळी शेवटी लिहीतात, "माझ्या डोक्यामध्ये सगळं वातावरण इतकं राममय झालं होतं, की serial च्या scenes मध्ये मला वनवास , भरत भेट .
असंच काहीसं जाणवत होतं.
डोक्यामध्ये अनेक विचार येत आहेत, की इतका छान राममय वातावरण अख्या जगात झाला आहे तर,
रामाची शिकवण आपल्यामध्ये रुजवण्याची गरज आहे असं मला वाटतं
मातृ-पितृ भक्ती, भावंडांवर असीम प्रेम, कर्तव्य, त्याग,
कोणाही विषयी कटूता न बाळगणे, सतत प्रसन्न आणि आनंदी राहणे, सत्याचा नेहमी विजय होतो. असं काहीसं आपल्यामध्ये सुद्धा आपण आत्मसात करावं आणि पुढच्या पिढीला ही ते द्यावं.
जय श्रीराम."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

#MyModiStory कशी झाली होती फडणवीस आणि मोदींची पहिली भेट? कार्यक्रम आयोजक ते मुख्यमंत्री...

ITR Filing Deadline: उद्यापासून 5,000 दंड; ITR भरण्याचा आज शेवटचा दिवस, 5 मिनिटांत स्वतः करा फाईल

Gold Rate Today : सोने पुन्हा स्वस्त, चांदीचाही भाव कमी, खरेदीपूर्वी जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा ताजा भाव

Sangli IT Bogus Raid : I Am From Income Tax म्हणत मध्यरात्री छापा, डॉक्टरला दीड किलो सोनं अन् १५ लाखांना चुना लावला...

Ashok Saraf : "वक्ख्या विक्खी वुख्खू" फेम अशोक मामांना संगीतसूर्य केशवराव भोसले पुरस्कार जाहीर, लवकरच कोल्हापुरात सोहळा

SCROLL FOR NEXT