prabhas File Photo
मनोरंजन

प्रभासने पूर्ण केली चाहत्याची अंतीम इच्छा ; भेटीनंतर मिळाले 10 दिवसांचे जीवनदान

नुकतेच प्रसिद्ध अभिनेता प्रभासला त्याच्या चाहत्याने एक मागणी केली आणि या मागणीमुळे त्या चाहत्याला 10 दिवसांचे जीवनदान मिळाले आहे. प्रभासचा हा फॅन त्याच्या आयुष्याच्या शेवटच्या घटका मोजत होता.

सकाळ डिजिटल टीम

एखाद्या सुपरस्टारचे असंख्य चाहते असतात. काही चाहते आपल्या आवडत्या कलाकाराकडे डान्स करण्याची किंवा आवडता डायलॉग म्हणण्याची मागणी करतात. नुकतेच प्रसिद्ध अभिनेता प्रभासला त्याच्या चाहत्याने एक मागणी केली आणि या मागणीमुळे त्या चाहत्याला 10 दिवसांचे जीवनदान मिळाले आहे. प्रभासचा हा फॅन त्याच्या आयुष्याच्या शेवटच्या घटका मोजत होता. वेम्पा कासी राजू या प्रसिद्ध बिझनेस मॅनने एका मुलाखतीत ही घटना सांगितली. राजू हे प्रभासच्या भीमावरम या गावचे आहेत आणि प्रभासचा चाहता हा राजू यांच्या गावचा आहे. 20 वर्षाचा हा मुलगा मृत्युशी झुंज देत होता. त्यावेळी त्याने प्रभासला भेटण्याची इच्छा व्यक्त केली. हे कळताच प्रभास त्याच्या चित्रपटाचे शूटिंग सोडून त्या चाहत्याला भेटायला आला. प्रभासने त्याच्यासोबत गप्पा मारल्या तसेच त्याच्या माथ्याचे चुंबन घेऊन तो लवकरच बरा होणार आहे अशा शुभेच्छा दिल्या. त्यामुळे त्या चाहत्याला जगण्याची नवी उमेद मिळाली.

राजूने मुलाखतीत सांगितले की डॅक्टरांनी सांगितले होते की तो मुलगा केवळ दोन तासच जगू शकतो. पण प्रभासच्या भेटीनंतर तो 10 दिवस जगला. प्रभासच्या चाहत्याच्या या घटनेवरून लक्षात येते की, तो फक्त पडद्यावरील हिरो नसून खऱ्या आयुष्यात हीतो चाहत्यांसाठी हिरोच आहे. प्रभासला चित्रपट इंडस्ट्रिमध्ये डार्लिंग का म्हणले जाते ते या घटनेवरून कळून येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe : कामातचं नाही सोशल मीडियावरही तुकाराम मुंढेंचा जलवा; देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, विश्वास नांगरे- पाटलांना टाकलं मागे

Nipani Tavandi Ghat Case : राष्ट्रीय महामार्गावरील तवंदी घाटाजवळ दगडाने ठेचून गडहिंग्लज साखर कारखान्यातील कर्मचाऱ्याचा खून; महमदवर धारदार शस्रानेही हल्ला

China Nepal Border: मृत्यूचे तांडव डोळ्यांसमोर पाहतोय! प्रत्यक्षदर्शीचा अनुभव; चीन-नेपाळ सीमेवर अडकले राज्यातील ४०० भाविक

Marathi News Live Updates : २०२७च्या जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र रकान्याची मागणी, राज्यस्तरीय मोर्चासह देशव्यापी आंदोलनाची तयारी

Sarvajan Pension Scheme: वृद्ध, विधवा अन् दिव्यांगांना दर महिन्याला थेट खात्यात पेन्शन; ‘सर्वजन पेन्शन योजने’साठी पात्रता काय?

SCROLL FOR NEXT