Prithviraj Sukumaran Injured: Esakal
मनोरंजन

Prithviraj Sukumaran Injured: प्रसिद्ध अभिनेत्याचा शूटिंगदरम्यान गंभीर अपघात! रुग्णालयात दाखल

Vaishali Patil

Prithviraj Sukumaran Hospitalised: मल्याळम अभिनेता पृथ्वीराज सुकुमारन हा साउथ इंडस्ट्रीतला लोकप्रिय अभनेता आहे. त्याच्या संदर्भात काळजीत टाकणारी बातमी समोर आली आहे.

त्याचा आगामी चित्रपट 'विलाथ बुद्ध' या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान पृथ्वीराजचा अपघात झाला आहे. या अपघातात त्याच्या पायाला दुखापत झाली असून आज त्याच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.

'विलाथ बुद्ध' च्या सेटवर अॅक्शन सीनचे शूटिंग करत असताना तो जखमी झाला होता. सुकुमारन इडुक्कीमधील मरूर येथे चित्रपटाच्या सेटवर अॅक्‍शन सीक्‍वेन्‍सचे शूटिंग करत असताना जखमी झाला.

वृत्तानुसार, हा अपघात सकाळी 10.30 वाजता झाला जेव्हा तो KSRTC बसमध्ये शूटिंग करत होता. अपघातानंतर, अभिनेत्याला प्रथम जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले, तेथून त्याला उपचारासाठी कोची येथे नेण्यात आले.

त्याच्या पायावर की-होल शस्त्रक्रिया होणार आहे. या शस्त्रक्रियेमुळे त्याला 2 ते 3 महिने विश्रांती घ्यावी लागणार आहे. मात्र अद्याप अभिनेता किंवा रुग्णालय व्यवस्थापनाकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

अभिनेता आणि दिग्दर्शक मुंबईत अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफसोबत त्याच्या आगामी बॉलिवूड प्रोजेक्ट 'बडे मियाँ छोटे मियाँ'मध्येही काम करत आहे.

त्याचबरोबर पृथ्वीराज अभिनेता मोहनलाल सोबत त्याचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'L2: Empuraan' चे शूटिंग सुरू करणार आहे, ज्याचे दिग्दर्शन स्वतः अभिनेता पृथ्वीराज सुकुमारन करणार आहेत. तो प्रशांत नील दिग्दर्शित ‘सलार’ या प्रभासच्या पुढील चित्रपटातही दिसणार आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lalbaugcha Raja Look: लालबागचा राजा २०२५ चा पहिला लूक समोर, प्रथम दर्शनातून दिसली पहिली झलक, पाहा व्हिडिओ

Rahul Gandhi: राहुल गांधींना किस केलं, सुरक्षा रक्षकानं तरुणाला पकडलं अन्...; बाईक रॅलीतील व्हिडिओ व्हायरल

AUS vs SA, ODI: दक्षिण आफ्रिकेचा वनडेतील सर्वात मोठा पराभव, तरी जिंकली ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिका; पाहा काय झाले रेकॉर्ड

Latest Marathi News Updates : पनवेलमध्ये पर्यावरणपूरक कागदापासून गणपतीच्या मूर्ती

Nagpur Fraud;'बेटिंग ॲप’द्वारे किराणा व्यापाऱ्याची २६ लाखांची फसवणूक; सायबर पोलिसांकडून चौघांविरोधात गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT