मनोरंजन

'शिव्या देऊन पैसे कमवणार नाही'

राजपाल यादव हे वेगवेगळ्या विषयांवरील त्यांची मतं मांडत असतात

प्रियांका कुलकर्णी

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता राजपाल यादव (rajpal yadav) त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांचे मनोरंजन करत असतात. नुकताच त्यांचा हंगामा-2 (hungama 2) हा चित्रपट प्रेक्षकांचा भेटीस आला. वेगवेगळ्या चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या राजपाल यादव यांना नुकत्याच एका मुलाखतीमध्ये ओटीटी प्लॅटफोर्मवर काम करण्याबाबात विचारण्यात आले. यावरील राजपाल यांच्या मताने अनेकांचे लक्ष वेधले.

मुलाखतीमध्ये रादपाल यांनी सांगितले, 'ओटीटीमध्ये सध्या दाखवण्यात येणाऱ्या कंटेंटमध्ये मी स्वत:ला फिट करू शकत नाही, गेल्या काही वर्षांमध्ये ज्या वेब सीरिज प्रदर्शित झाल्या त्यांच्यासोबत मी कनेक्ट होऊ शकत नाही. सध्या वेब सीरिजमध्ये शिव्या दिल्या जातात. मला चित्रपटांमध्ये शिव्या द्यायला आवडत नाहीत. मला अशी कोणतीच गोष्ट करायला आवडणार नाही जे मी व्यक्तिगत आयुष्यात करणे टाळतो. मी स्क्रिनवर शिव्या देऊ शकत नाही. मी शिव्या न देता लोकांची पसंती मिळवली आहे. मला चित्रपटांमध्ये वाईट बोलून किंवा शिव्या देऊन पैसे कमवायचे नाहित. मी खूप भाग्यवान आहे की, गेली कित्येक दिवस मी लोकांचे मनोरंजन शिव्या न देता आणि वाईट शब्द न वापरता करत आहे.'

राजपाल यांनी बॉलिवूडमधील अनेक चित्रपटांमध्ये विनोदी भूमिका साकारल्या आहेत. चूप चुप के, मुझसे शादी करोगी, वक्ते: रेस अगेन्स्ट टाइम, मैने प्यार क्यूं कीया आणि भूल भुलैया या चित्रपटांमध्ये राजपाल यांनी काम केले आहे. राजपाल यांच्या 'हंगामा-2' या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. या चित्रपटात परेश रावल आणि शिल्पा शेट्टी हे कलाकार प्रमुख भूमिका साकारली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

युरोपात ३०-३५ डिग्री सेल्सिअसने हाहाकार, भारतात ४५वर पारा पोहोचूनही रस्ते वितळत नाहीत; कारण काय?

५ सामने, ३० चौकार, २९ षटकार अन् ३५५ धावा... Vaibhav Sooryavanshi ची इंग्लंडमधील कामगिरी भारताला विचार करायला लावणारी..

Small Savings Schemes: PPF आणि पोस्ट ऑफिस FD गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! पुढील 3 महिन्यांसाठी व्याजदर जाहीर; पाहा नवे दर

Ramtirth Waterfall : पांढराशुभ्र फेस अन् खळखळणारा आवाज! आंबोलीतील प्रसिद्ध रामतीर्थ धबधबा प्रवाहित; पावसाच्या पाण्यामुळं खुललं सौंदर्य, पर्यटकांची गर्दी

Europe Heatwave: युरोपमध्ये उष्णतेचा कहर! रस्ते वितळले, लोखंडी ट्रॅक वाकले, हजारो नागरिक रुग्णालयात...भयानक व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT