actor riteish deshmukh and genelia apologize to kolhapur reporter for insulting in ved movie promotion event  sakal
मनोरंजन

Riteish Deshmukh: मला माफ करा.. एका चुकीसाठी रितेशला मागावी लागली पत्रकारांची माफी..

कोल्हापुरात रितेशच्या टीमकडून झाला पत्रकारांचा अपमान..

नीलेश अडसूळ

प्रसिद्ध अभिनेता रितेश देशमुख हा सध्या त्याच्या आगामी 'वेड' चित्रपटामुळे चर्चेत आहे. 'वेड' या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी रितेश देशमुख कोल्हापूरात गेला होता आणि तिथे असे काही झाले की त्यामुळे रितेश देशमुखला पत्रकारांची जाहीर माफी मागावी लागली. या प्रकरणाची सध्या बरीच चर्चा आहे. (actor riteish deshmukh and genelia apologize to kolhapur reporter for insulting in ved movie promotion event )

रितेश देशमुख गेल्या काही दिवसांपासून वेड चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. अशातच तो कोल्हापूरातही त्याच्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी गेला होता. यावेळी पत्रकारांशी त्याने संवाद साधावा यासाठी अनेक पत्रकार जमले होते. पण रितेशच्या मीडिया ऑर्गनायझरने पत्रकारांचा अपमान केला त्यांना बॉउन्सरच्या सहाय्याने हॉटेलमधून हाकलून लावले. त्यानंतर रितेशने सपत्नीक कोल्हापूरातील महालक्ष्मीचेही दर्शन घेतले. यावेळी रितेश मंदिरातून बाहेर पडताच पत्रकारांनी त्याला अडवले आणि जाब विचारला.

हेही वाचा : Love Jihad: प्रेमाला धर्म आहे...?

परंतु या प्रकरणाबाबत मी अनभिज्ञ असल्याचे रितेशने त्यांना सांगितले आणि पत्रकारांची माफी मागत त्याने अवमान झालेल्या सर्व पत्रकारांची माफी मागितली. ''तुमचा अवमान झाला. मला माफ करा. तुमच्यासोबत नक्की काय घडलं हे मला माहिती नाही. मी इथे आलो पण मला कोणाला भेटायचं आहे हेही माहिती नव्हतं. ते माझ्या हातातही नाही. तुमचा माझ्याकडून अवमान झाला असेल तर मी माफी मागतो. तुमच्या भावना माझ्यापर्यंत पोहचल्या आहेत, असे रितेश देशमुख म्हणाला.

'माझ्या लग्नाला ११ वर्षे झाली आहे. पण कोल्हापूरात महालक्ष्मीच्या दर्शनाला आम्हाला कधीच एकत्र येता आले नाही. काही लोकांची समोरासमोर भेट झाली नाही, त्यांची मी माफी मागतो. तुम्हा सर्वांवर महालक्ष्मीचा आशीर्वाद असावा हीच इच्छा,' असेही रितेशने म्हंटले आहे.

३० डिसेंबरला त्याचा हा वेड चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन स्वतः अभिनेता रितेश देशमुखनेच केलं आहे तसेच या चित्रपटाद्वारे अभिनेत्री जिनिलीया देशमुख मराठी चित्रपटसृष्टी पदार्पण करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prithviraj Chavan statement: 'ऑपरेशन सिंदूर'च्या पहिल्याच दिवशी झाला होता भारताचा पराभव - पृथ्वीराज चव्हाणांचं विधान!

IPL 2026 All Teams: ग्रीन सर्वात महागडा खेळाडू, तर अनकॅप्ड खेळाडूंही मलामाल; लिलावानंतर पाहा सर्व संघांतील खेळाडूंची यादी

IPL 2026 Auction Live: जाता जाता Prithvi Shawला दिलासा! एका फ्रँचायझीला आली दया... घेतलं एकदाचं संघात, बघा कोणाकडून खेळणार

PL 2026 Auction : पप्पू यादव यांचा मुलगा आयपीएलमध्ये खेळणार; लिलावात मोजली तगडी रक्कम, जाणून घ्या कोणत्या संघाची झाली कृपा

मोठी बातमी! सिडनीतील दहशतवादी हल्ल्याचं भारतीय कनेक्शन उघड; तेलंगणा पोलिसांनी केली पुष्टी...

SCROLL FOR NEXT