actor sandeep pathak gets best actor award for rakh movie in jammu international film festival  sakal
मनोरंजन

जम्मू आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात अभिनेता संदीप पाठक सन्मानित..

अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांतून ‘राख’ चित्रपटातील भूमिकेसाठी अभिनेते संदीप पाठक यांना गौरविण्यात आले आहे.

नीलेश अडसूळ

नाटक, चित्रपट, मालिका अशा तिहेरी माध्यमात आपल्या अभिनयाने चौकार षटकार लागवणारा अभिनेता संदीप पाठक (sandeep pathak) याने मनोरंजन विश्वात कायमच स्वतःचे वेगळेपण सिद्ध केले आहे. सध्या तो करत असलेल्या 'वऱ्हाड निघालंय लंडनला' या नाटकाचे प्रयोग वाऱ्याच्या वेगाने सुरु आहेत. याशिवाय झी मराठी वरील 'डान्स महाराष्ट्र डान्स'च्या लिटिल मास्टर्स या पर्वाचे देखील तो सूत्रसंचालन करत आहे. पण सध्या चर्चा आहे ती त्याच्या 'राख' या चित्रपटाची. मध्यंतरी या चित्रपटाला आंतरराष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला होता. आता याच चित्रपटासाठी जम्मू आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात अभिनेता संदीप पाठकला सन्मानित करण्यात आले आहे.

(actor sandeep pathak gets best actor award for rakh movie in jammu international film festival)

अलीकडच्या अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांतून ‘राख’ चित्रपटातील भूमिकेसाठी अभिनेते संदीप पाठक याला गौरविण्यात आले आहे. आता जम्मू आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातही संदीप पाठकने सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार पटकावत आपल्या यशाची मालिका सुरुच ठेवली आहे. १५ देशांचे ५४ चित्रपट या आंतरराष्ट्रीय महोत्सवासाठी निवडण्यात आले होते.

‘आपण केलेल्या कष्टाला जेव्हा कौतुकाची थाप मिळते. तो क्षण भाग्याचा असतो. हा पुरस्कार मला मिळाला असला तरी आमच्या संपूर्ण टीमचे हे श्रेय आहे. एक वेगळी कलाकृती सादर करण्याचा आमच्या टीमचा हा प्रयत्न यशस्वी झाला असून विविध महोत्सवांमध्ये घेतली जाणारी ‘राख’ चित्रपटाची दखल आम्हाला सुखावणारी असल्याचे संदीप पाठक याने सांगितले. 'राख' या चित्रपटाचं दिग्दर्शन राजेश चव्हाण यांनी केलंय. लवकरच ‘राख’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra School Strike : पालकांनो नोंद घ्या! 7 आणि 8 जुलै रोजी राज्यातील 'या' शाळा राहणार बंद; शिक्षक समन्वय संघाचा मोठा निर्णय, काय आहे कारण?

Smart Meter Maharashtra : स्मार्ट मीटरला भाजपच्या मंत्री आमदारांचाच विरोध, ग्रामीण भागात रोष वाढला; स्मार्ट मीटर बसवणे बंद होणार? ऊर्जा मंत्रीचे स्पष्टीकरण

FIFA World Cup 2026 : 16 वर्षांनंतर स्पेनची बाद फेरीत दमदार एन्ट्री! ऑस्ट्रियाला 3-0 ने हरवत राऊंड ऑफ 16 गाठलं

Latest Marathi Live Update: राष्ट्रीय कामाच्या नावाखाली शिक्षकांवर वाढता ताण; विद्यार्थ्यांच्या शिक्षणावरही परिणाम

Khadakwasala Dam Water : खडकवासला धरणसाखळीत पाणीसाठा वाढू लागला; चार दिवसांच्या पावसाने नेमका काय बदल घडवला?

SCROLL FOR NEXT