shah rukh khan
shah rukh khan  Sakal
मनोरंजन

Shah Rukh Khan: ‘खूप चुका केल्या, उद्धटपणा केला, पण तिने सांभाळून घेतलं…’, कोणासाठी असं म्हणाला शाहरुख, पाहा व्हिडिओ

सकाळ डिजिटल टीम

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानने त्याच्या जुन्या दिवसांबद्दल अनेकदा बोलले आहे. शाहरुख खाननेही अनेकवेळा आपल्या चुकांबद्दल बोलले आहे. आता किंग खानचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यामध्ये तो त्याची पत्नी गौरी खानबद्दल खूप भावूक होत आहे.

किंग खानने असेही सांगितले की गौरीनेच त्याला कठीण परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी साथ दिली. ती त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली.

खरं तर ही क्लिप खूप जुनी आहे. हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे, ज्यामध्ये शाहरुख खान आपल्या पत्नीचे कौतुक करत आहे. शाहरुख खान म्हणाला, ‘मला असं वाटत गौरीने मला प्रचंड सांभाळलं. मी खूप चुका केल्या, उद्धटपणा केला, गैरवर्तन केले. पण गौरीने मला अनेक ठिकाणी शांत केले.

अनेकदा मी गैरवर्तन केलं. योग्य निर्णय घेतले नाही, गौरीने अशा वेळी शांत राहून माझी साथ दिली.’ असे म्हणत शाहरुख याने त्याच्या आयुष्यात गौरीचं असलेलं महत्त्व सर्वांसमोर सांगितलं.

शाहरुख खान आणि गौरी खान यांची प्रेमकहाणी बॉलिवूडच्या सुपरहिट प्रेमकथांपैकी एक आहे. शाहरुख खान आणि गौरी यांचा विवाह २५ ऑक्टोबर १९९१ रोजी झाला होता. दोघांची जोडी खूप सुंदर दिसत आहे. अलीकडेच अलाना पांडेच्या लग्नात शाहरुख आणि गौरीने जबरदस्त डान्स केला.

‘पठाण’ चित्रपटाने प्रदर्शित झाल्यानंतर काही दिवसांनी जगभरात नवीन विक्रम रचले. २५ जानेवारी रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झालेल्या ‘पठाण’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर देखील मोठी मजल मारली. फक्त भारतातच नाही तर, जगभरात चित्रपटाने नवे विक्रम रचत वेगळी ओळख निर्माण केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Google Error : गुगल डाऊन! जगभरातील युजर्स त्रस्त; अमेरिकेतून 1400 तक्रारी

Yogi Adityanath : काँग्रेस सत्तेत आल्यास हिंदूंची विभागणी होईल - योगी आदित्यनाथ

IPL 2024, CSK vs PBKS Live Score: आक्रमक खेळणाऱ्या रुसोचा शार्दुल ठाकूरने उडवला त्रिफळा; चेन्नईला मिळाली तिसरी विकेट

Loksabha election 2024 : जेडीयूचे माजी प्रदेशाध्यक्ष शशांक राव यांचा भाजपात प्रवेश; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

SCROLL FOR NEXT