Subodh Bhave said he wants career in modeling in college day not a actor sakal
मनोरंजन

Subodh Bhave: मला कधीच अॅक्टर व्हायचं नव्हतं.. सुबोध भावेनं सांगितली मनातली 'ती' इच्छा..

एका मुलाखतीत सुबोध भावेने त्याला कोणत्या क्षेत्रात करियर करायचं होतं याबाबत सांगितलं आहे.

नीलेश अडसूळ

Subodh Bhave: मराठीतील प्रसिद्ध अभिनेता सुबोध भावे हा त्याच्या वेगवेगळ्या भूमिकांसाठी ओळखला जाणारा कलाकार आहे. खरं तर तो नेहमीच चरित्र भूमिकांसाठी प्रेक्षकांची पसंती मिळवताना दिसला आहे. यापूर्वी त्यानं बालगंधर्व, लोकमान्य टिळक, काशिनाथ घाणेकर, छत्रपती शिवाजी महाराज अशा विविध भूमिका साकारल्या आहेत.

याशिवाय सोबत अनेक मालिका आणि नाटकातूनही झळकला आहे. सुबोधने कायमच आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे. आज जरी तो मराठीतील एक मोठा नट असला तरी त्याला अभिनयात करियर करायचे नव्हते.

तुम्हाला धक्का बसेल ऐकून, पण हे खरे आहे. सुबोधला (subodh bhave) एका वेगळ्याच क्षेत्रात करियर करायचे होते. याबाबत नुकतेच त्याने एका मुलाखतीत सांगितले आहे. हा व्हिडिओ सध्या बराच व्हायरल होत आहे.

(Subodh Bhave said he wants career in modeling in college day not a acting)

सुबोध भावे आणि प्रियदर्शनी इंदलकर यांचा फुलराणी सिनेमा नुकताच रिलीज झालाय. एका आजारामर नाटकावर आधारित या सिनेमाची बरीच चर्चा झाली. सुबोधही या चित्रपटात एका वेगळ्याच अंदात दिसला.

या चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने सुबोध अनेक ठिकाणी गेला. यावेळी एका माध्यमाने सुबोधला करियर विषयी विचारले. तेव्हा त्याने अभिनय क्षेत्रात करियर करायचे नसून या वेगळ्या क्षेत्राबाबत खुलासा केला.

हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

या मुलाखतीत सुबोध म्हणाला की, 'मला अभिनेता कधीच व्हायचं नव्हतं.. मला मॉडेलच व्हायच होतं. अगदी कॉलेजला असल्यापासून मला हेच क्षेत्र हवं होतं. पण जे स्वप्न तेव्हा पूर्ण झालं नाही ते आता पूर्ण होतंय.. कारण 'फुलराणी' चित्रपटात मी अशाच मॉडेल्सला घडवत आहे. या निमित्ताने मला हे खूप रिलेट होत होतं.. ते क्षण मला अनुभवता आले. मला माझ्या कॉलेजचे दिवस आठवले. त्यामुळे हे पात्र करताना मला खूप आवडत होतं. मी माझं स्वप्न जगत होतो. प्रियदर्शिनी किंवा इतर मुली रॅम्प वॉक करताना मी स्वतःला तिथे पाहत होतो. कारण माझीही प्रचंड इच्छा होती, रॅम्प वॉक करायची.' अशा शब्दात सुबोधने आपली इच्छा बोलून दाखवली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Liam Livingstone ला १३ कोटी देण्याची खरच गरज होती का? काव्या मारनच्या निर्णयावर होतेय टीका, मोहम्मद शमीचं नाव ओढलं जातंय... कारण

Kalyan Dombivli Elections: कल्याण डोंबिवलीत ठाकरे एकजुटीचे राजकीय संकेत; महापालिका रणधुमाळीपूर्वी हालचालींना वेग

Ambani gifts Lionel Messi : अनंत अंबानींकडून मेस्सीला 11 कोटींचं घड्याळ भेट! एवढं महाग का आहे Richard Mille घडयाळ? काय आहे खास?

Germany Jobs: ‘मेड इन महाराष्ट्र’ मनुष्यबळाला जर्मनीचे दरवाजे बंद? १० हजार तरुणांचे भविष्य टांगणीला

Nashik Marathi Vishwa Sammelan : नाशिकमधील 'मराठी विश्व संमेलन' लांबणीवर; जानेवारीअखेर किंवा फेब्रुवारीत रंगणार सोहळा!

SCROLL FOR NEXT