actor sumeet raghvan tweeted on eknath shinde revolt against mahavikas aghadi
actor sumeet raghvan tweeted on eknath shinde revolt against mahavikas aghadi  sakal
मनोरंजन

तुमच्या यादीत महाराष्ट्र हित.. सुमीत राघवनने घेतला एकनाथ शिंदेंचा समाचार

नीलेश अडसूळ

maharashtra politics : शिवसेना नेते एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी बंड पुकारल्यामुळे महाविकास आघाडी सरकार चांगलेच अडचणीत आले आहे. एकनाथ शिंदे यांची वाट पुन्हा शिवसेनेकडे वळवण्यासाठी अनेक प्रयत्न सुरू आहेत परंतु एकनाथ यांची बाजू अधिकच भक्कम होत चालली आहे. आता पर्यंत 40आमदारांचा पाठिंबा त्यांच्याकडे आहे. काही खासदारही त्यांच्या संपर्कात असल्याच्या बातम्या आहेत. एकूणच राजकीय स्थिती पूर्णतः ढवळून निघाली आहे. शिंदे यांनी बंडाच्या भूमिकेमागे नेमकं काय कारण आहे याचे सविस्तर उत्तर शिवसेनेला ट्विट द्वारे दिले. याच ट्विट वरुन अभिनेता सुमीत राघवन याने एकनाथ शिंदे यांना चांगलेच सुनावले आहे. (actor sumeet raghvan tweeted on eknath shinde revolt against mahavikas aghadi) (sumeet raghvan on eknath shinde)

या ट्विट मध्ये चार मुद्द्यांच्या आधारे एकनाथ शिंदे यांनी आपल्या मनातील खदखद बोलून दाखवली आहे.'गेल्या अडीच वर्षात महाविकास आघाडी सरकारचा फायदा केवळ घटक पक्षांना झाला. यामध्ये शिवसैनिक भरडला गेला. एकीकडे घटक पक्ष मजबूत होत असताना शिवसैनिकांचे आणि शिवसेनेचे मात्र पद्धतशीर खच्चीकरण होत गेलं. पक्ष आणि शिवसैनिक टिकवण्यासाठी अनैसर्गिक आघाडीतून बाहेर पडणं अत्यावश्यक आहे. महाराष्ट्र हितासाठी आता निर्णय घेणे गरजेचं आहे,' असं शिंदे यांनी ट्विट करत उद्धव ठाकरे यांच्यापुढे मनोगत मांडले. परंतु ही ट्विट त्यांना चांगलेच महागात पडले आहे. या ट्विट मधील एक महत्वाचा मुद्दा हेरून सुमीत निशाणा साधला आहे.

या ट्विट मध्ये शिंदे यांनी महाराष्ट्र हीत चौथ्या क्रमांकावर ठेवले आहे, म्हणून सुमीत म्हणतो, 'साहेब, तुमच्या यादीत ‘महाराष्ट्र हित’ चौथ्या क्रमांकावर आहे आणि माझा मुद्दा हाच आहे. शिवसैनिक भरडले जात आहेत, त्यांचे खच्चीकरण होत आहे. अनैसर्गिक आघाडी वगैरे हे सगळं बरोबर आहे, पण जो सामान्य माणूस आहे तो सदैव मागेच राहणार. तो जो ‘आता’ आहे ना त्या वाक्यातला तो वेदना देणारा आहे.' असे ट्विट सुमीतने केले आहे. ट्विटची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi : ध्यानमुद्रेत बसले पीएम मोदी; पुढचे ४५ तास अन्नाचा कणही घेणार नाहीत

Bhagwan Pawar: पुणे महापालिकेच्या आरोग्य प्रमुखांवर निलंबनाची कारवाई! काय घडलं नेमकं? जाणून घ्या

Heatstroke : बिहारमध्ये उष्माघाताने ३८ जणांचा मृत्यू तर मध्य प्रदेशात दोन चिमुकले दगावले

Pune Traffic News: गणेशखिंड रस्त्यावरील वाहतुकीत एक जूनपासून बदल, वाचा महत्वाची बातमी

Railway News: नागरिकांच्या प्रवासावर ब्लॉक नको; मेगा ब्लॉकवर मनसे आमदार राजू पाटील यांचे ट्विट

SCROLL FOR NEXT