actress gauahar khan fathers demise funeral ceremony photos will make you cry
actress gauahar khan fathers demise funeral ceremony photos will make you cry  
मनोरंजन

गौहर खानच्या वडिलांचे निधन 

सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई - बॉलीवूडमधील प्रसिध्द अभिनेत्री गौहर खान हिच्या वडिलांचे आज निधन झाले. ते बराच काळापासून आजारी होते. त्यांचे नाव जाफर अहमद खान असे होते. गौहरनं सोशल मीडियावर ही बातमी आपल्या चाहत्यांना दिली. चाहत्यांनी तिच्या दु;खात सहभागी होत त्यांना भावपूर्ण श्रध्दांजली वाहिली आहे. काही दिवसांपूर्वी गौहरनं आपले वडिल एका रुग्णालयात असल्याची माहिती दिली होती. ते लवकरात लवकर बरे व्हावे यासाठी तिनं फॅन्सला देवाकडे प्रार्थना करण्यास सांगितले होते.

इंस्टावर एक पोस्ट शेअर करुन गौहरनं वडिलांविषयीच्या वेगवेगळ्या आठवणींना उजाळा दिला होता. गौहरची प्रीती सिमोस नावाची एक मैत्रीण आहे तिनं गौहरच्या वडिलांविषयी लिहिले होते. याशिवाय तिनं एक व्हिडिओही शेअर केला होता. माझ्या गौहरचे पप्पा यांच्यावर माझे खूप प्रेम होते. त्यांनी आपले जीवन मोठ्या सन्मानानं व्यतीत केले. ती त्यांची ओळख होती. देव गौहर खान आणि त्यांच्या परिवाराला या दु;खातून सावरण्याची शक्ती देवो, असे तिनं म्हटलं आहे.

गौहर खानच्या वडिलांच्या निधनाची बातमी विरल भयानीनं आपल्या सोशल मीडियावरुन शेअर केली आहे. दोन दिवसांपूर्वी गौहरनं वडिलांबरोबरचा एक फोटो शेअर केला होता. आता त्यांच्या अंत्यविधीचे फोटो समोर आले आहेत. ज्यात गौहर खान आपल्या परिवाराला आधार देताना दिसत आहे. याबरोबरच गौहर खानची आईही त्या फोटोमध्ये दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी गौहर खानचे जैद दरबारशी लग्न झाले होते. लग्नाला काही दिवस झाल्यानंतर गौहरच्या वडिलांचे झालेले निधन हे सर्वांच्या मनाला चटका लावणारे आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT