मनोरंजन

अभिनेत्री हेमल कलापूरचा अभिमान...!

संभाजी गंडमाळे

आजवर अनेक सौंदर्य स्पर्धांमध्ये यश मिळवलं. सिनेसृष्टीत पर्दापण करताना ‘हुषारू’ हा पहिला तेलगू चित्रपट केला. हा चित्रपट सुपरहिट ठरला. मराठीत पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर झळकले ते नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘अशीही आशिकी’ या चित्रपटाच्या माध्यमातून. या चित्रपटामुळं अनेक गोष्टीही शिकायल्या मिळाल्या... मिस इंडिया अभिनेत्री हेमल इंगळे संवाद साधत असते आणि तिचा सारा प्रवास उलगडत असतो. 

दरम्यान, हेमलच्या निमित्तानं कलापूरचा एक आश्‍वासक चेहरा सिनेसृष्टीला मिळाला असून कलापूरसाठी येत्या काळातही ही एक अभिमानाचीच गोष्ट ठरणार आहे.  

हेमल सांगते, ‘‘अशीही आशिकी’ चित्रपटाला रसिकांचा प्रतिसाद तर मिळालाच; पण अभिनेता सचिन पिळगावकर यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव फार आनंददायी होता. या चित्रपटाचं लेखन, दिग्दर्शन आणि संगीत दिग्दर्शनही त्यांनीच केलं आहे. अभिनेता अभिनव लक्ष्मीकांत बेर्डेबरोबर या चित्रपटात मुख्य नायिकेची भूमिका होती. चित्रपटात एकूण पाच गाणी आहेत आणि टायटल साँग स्वित्झर्लंडमध्ये शूट झालं. एकूणच पहिल्याच मराठी चित्रपटाच्या निमित्तानं बरेच काही शिकता आले. आता लवकरच ‘आस’ हा चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहे तर ‘लक्ष्मी तनय्या’ या कन्नड चित्रपटाचं शूिटंगही लवकरच सुरू होईल.’’ 

भारतीय आयुर्विमा महामंडळाचे विकास अधिकारी देवेंद्र इंगळे यांची हेमल कन्या. तिचं माध्यमिक शिक्षण होलीक्रॉस कॉन्व्हेंट स्कूलमध्ये झालं. त्यानंतर पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमध्ये महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केलं. नुकतीच सायबर कॉलेजमधून तिने एमएस्सी पदवी मिळवली. २०१५ मध्ये तिने ‘मिस युनिव्हर्सिटी इंडिया’चा किताब पटकावला. त्यानंतर २०१६ ला ‘मिस अर्थ इंडिया फायर’ आणि ‘मिस इंडिया एक्विजिट- क्वीन फॉर अ कॉज’ हे किताब पटकावले. त्यानंतर तिचा सिनेसृष्टीतील प्रवास सुरू झाला. यशाचा एकेक टप्पा आता ती पार करत कलापूरचं नाव आणखी उंचीवर नेणार आहे.

कलापूर हे कलासक्त माणसांचे गाव. राजर्षी शाहू महाराजांनी कलेला प्रोत्साहन दिले. आपला इतिहास देदीप्यमान आहेच. पण, वर्तमानातही अनेक गोष्टी कलाकारांना बळ देत आहेत. ‘मिस अर्थ इंडिया’साठी व्होटिंगचे आवाहन केल्यानंतर देशभरातून सर्वाधिक व्होट मला मिळाले. अर्थातच ते कोल्हापूरकरांनी दिले आणि मी विजेती ठरले. येत्या काळातही कलापूरचे पाठबळ नक्कीच प्रेरणा देत राहणार आहे.
- हेमल इंगळे,
अभिनेत्री

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Google Error : गुगल डाऊन! जगभरातील युजर्स त्रस्त; अमेरिकेतून 1400 तक्रारी

Yogi Adityanath : काँग्रेस सत्तेत आल्यास हिंदूंची विभागणी होईल - योगी आदित्यनाथ

IPL 2024, CSK vs PBKS: चेन्नईला पंजाबच्या गोलंदाजांनी रोखलं अन् फलंदाजांनी ठोकलं; ऋतुराजसेनेचा बालेकिल्ल्यात दुसरा पराभव

Loksabha election 2024 : जेडीयूचे माजी प्रदेशाध्यक्ष शशांक राव यांचा भाजपात प्रवेश; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

SCROLL FOR NEXT