actress hemangi kavi shared post on facebook she tell about mahervashin and married girl  Sakal
मनोरंजन

Hemangi Kavi: मुलींना लवकर मोठ्ठं व्हायची घाई असते, हेमांगीची ही पोस्ट वाचाच..

अभिनेत्री हेमांगी कवी माहेराहून परतताना एक खास पोस्ट केली आहे.

नीलेश अडसूळ

hemangi kavi : हेमांगी कवी हे मराठी मनोरंजन विश्वातील एक महत्वाचं नाव. अनेक मालिका, चित्रपट, नाटक तिच्या कसदार अभिनयाने गाजले आहेत. अभिनयासोबतच निरनिराळ्या कारणाने ती चर्चेत असते. ती अत्यंत परखडपणे आपले पुरोगामी विचार लोकांपर्यंत पोहचवत असते. त्यामुळे बऱ्याचदा तिला खूप ट्रॉल केले जाते. तर कधी तिच्या बेधडकपणामुळे कौतुकाची थापही तिला मिळते. आज हेमांगी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. कारण आजची तिची पोस्ट खूप खास आहे. आज तिने आपल्या लहानपणीच्या, माहेरच्या काही आठवणी सांगितल्या आहेत. नुकतीच ती आपल्या माहेराहून परतली. त्यानिमित्ताने तिने ही पोस्ट केली आहे. ही पोस्ट अगदी प्रत्येक मुलीला आपली वाटणारी आहे.

(actress hemangi kavi shared post on facebook she tell about mahervashin and married girl )

सध्या सोशल मीडियावर 'टेल मी यु आर..' असा ट्रेंड सुरू आहे. हेमांगीने या ट्रेंडला काहीसा ट्विस्ट देत 'Tell me you are माहेरवाशीण.. Without telling me you are माहेरवाशीण!' असं म्हणत एक पोस्ट केली आहे. यामध्ये ती माहेरवाशीण कशी ओळखायची, याबद्दल बोलली आहे. हेमांगी आपल्या माहेरी गेली होती. आईकडे छान आराम केल्यानंतर निघताना तिच्या कपाळावर हळदी-कुंकू लावलं गेलं. यावेळी हेमांगी काहीशी भावनिक झाली. यासंदर्भात तिने एक पोस्ट केली आहे.

हेमांगी म्हणते, ''Tell me you are माहेरवाशीण.. Without telling me you are माहेरवाशीण!'' Western कपड्यांवर ही जिच्या कपाळी हळद कुंकु दिसतं तिला माहेरवाशीण समजावं!.. मुलगी,सुन ४ दिवस माहेरी/सासरी राहून आपल्या घरी निघाली की तिला हळद- कुंकू लावायचं! हे मी लहानपणापासून बघत आलेय.''

''लहानपणी आईने घरी आलेल्या पाहुण्यांना हळद- कुंकू लावलं की आम्हांला ही लावायचं हा नियमच होता! ते काय वय नव्हतं पण लहान मुलींच्या हट्टासमोर कुणाचं काय चालतंय? म्हणून माझी आई ही लावायची. काय अप्रूप होतं काय माहीत पण मज्जा यायची. कदाचित आपण ही मोठे झालो आहोत हं, आता मला ही सगळं कळतं बरं का हे समजायची आणि दाखवण्याची हौस असावी. पण मुलींना एक खोड असतेच, त्यांना लवकर मोठ्ठं व्हायची घाई असते! मग कुठं आईच्या साड्या नेस, आईचं मंगळसुत्र घाल, चपला घाल, खेळात आईच हो! तेव्हा वाटायचं कध्धी एकदाचे मोठे होतोय आणि आता वाटतंय…. Yes exactly हे वाचत असताना तुम्ही मनातल्या मनात जे म्हणालात ना तेच वाटतंय''

''तर आता खरंच मोठं झाल्यावर त्या हळदी कुंकूचा हट्ट नाही राहीला पण तुम्ही त्याला परंपरा म्हणा, संस्कृती म्हणा किंवा अगदी लागलेली सवय म्हणा घरातून बाहेर पडताना कपाळावर लागलेले हे दोन रंग अजूनही मज्जाच आणतात.'' अशा शब्दात तिने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ही पोस्ट सध्या बरीच व्हायरल होताना दिसतेय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur : शेतकऱ्यानं म्हशी घ्यायला ७ लाख साठवले, सहावीत शिकणाऱ्या लेकानं गेमवर ५ लाख उडवले; बँक स्टेटमेंट बघून बसला धक्का

Zodiac Prediction 7 to 13 July: या आठवड्यात कोणत्या राशींना होणार आर्थिक लाभ अन् नोकरी व्यवसायत मिळेल उत्तम संधी, वाचा साप्ताहिक राशिभविष्य

Latest Maharashtra News Updates : मुंबईत वाहतूक ठप्प! मोनो रेल सेवा बंद, मेट्रोमध्ये तांत्रिक बिघाडाने प्रवाशांचे हाल

Viral Video : सुनेची आईसोबत मिळून सासुला बेदम मारहाण; झिंज्या पकडल्या, उचलून आपटलं अन्... व्हिडिओ व्हायरल

CA Result Success Story: अभ्यासातील सातत्य, जिद्दीच्या बळावर साकारले स्वप्न; राजनवर कौतुकाचा वर्षाव; सीए परीक्षेत ६०० पैकी मिळविले ५१६ गुण

SCROLL FOR NEXT