huma qureshi Sakal
मनोरंजन

Huma Qureshi: लग्न कधी करशील? हुमा म्हणते, 'दबावात येऊन मी...'

बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरेशी तिच्या दमदार अभिनयासाठी ओळखली जाते.

Aishwarya Musale

बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरेशी तिच्या दमदार अभिनयासाठी ओळखली जाते. हुमाने अनुराग कश्यपच्या 'गँग्स ऑफ वासेपूर'मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आणि आतापर्यंत अनेक उत्तम चित्रपटांमध्ये काम केले आहे. अभिनेत्रीने नुकतेच लग्नाबाबत मोठे वक्तव्य केले आहे.

हुमा म्हणाली की तिला लग्नाची घाई करायची नाही. अभिनेत्री सध्या तिच्या मिस्टर राईटची वाट पाहत आहे. तिच्यावर लग्नासाठी कोणतेही दडपण नाही आणि इंडस्ट्रीतील अनेक अभिनेत्रींनी लग्न केले आहे, या दबावाखाली लग्न करणार नसल्याचे तिने सांगितले.

लग्नाशी संबंधित प्रश्न विचारल्यावर हुमाने एका मुलाखतीत सांगितले की, तिला सध्या लग्नाबाबत कोणतीही घाई करायची नाही. ती म्हणाली की तो अजूनही ती तिच्या आयुष्यात योग्य व्यक्तीची वाट पाहत आहे. अभिनेत्रीने नुकतेच इंस्टाग्रामवर आस्क मी एनीथिंग सत्र आयोजित केले होते जिथे तिने चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली.

अभिनेत्री सध्या लॉस एंजेलिसमध्ये असून एलए फॅशन वीकमध्ये सहभागी होत आहे. अभिनेत्रीला तिच्या आयुष्यात काही गोष्टी वैयक्तिक ठेवायच्या आहेत, असेही हुमा म्हणाली.

हुमाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर, अभिनेत्री 'महाराणी' सीझन 2 मध्ये दिसली होती. याशिवाय ती 'मिथ्या', 'माय डबल एक्सेल' आणि 'मोनिका ओ माय डार्लिंग'मध्येही दिसली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ठाणे हादरलं! ठाकरे गटाच्या नेत्यावर झाडल्या गोळ्या, उपचारावेळी मृत्यू

लालबाग राजाच्या चरणी भक्तांनी भरभरून दिलं दान; १२ दिवसात कोट्यवधींची रोकड

Exam Fee : दुष्काळग्रस्त भागातील दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी

Motorcycle Accident : मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन दोन जण ठार :एक जखमी

CSK च्या कोचिंग स्टाफमध्ये बदलाचे वारे! झहीरपाठोपाठ माजी वेगवान गोलंदाजाचीही संघात एन्ट्री

SCROLL FOR NEXT