ketaki chitale
ketaki chitale 
मनोरंजन

केतकी चितळे पुन्हा चर्चेत; होळीच्या दिवशी झाला धिंगाणा 

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - होळीचा सण म्हणजे मजा,मस्ती आणि धमाल. या दिवशी होळी पोटवली जाते आणि होळीला सुवासिनी नैवेद्य दाखतात. तसेच लहान मुलं दिमडी वाजवतात. ही परंपरा गेली अनेक वर्ष सुरू आहे. याचा त्रास आता मराठी अभिनेत्रीला झाला आहे. ही अभिनेत्री म्हणजे केतकी चितळे. नुकताच केतकीने एक व्हिडीओ सोशल मिडीयावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये केतकी तिच्या सोसायटीमधील एका महिलेला ओरडताना दिसत आहे.

केतकीला एपिलेप्सीचा आजार लहानपणापासूनच आहे. यामध्ये जास्त आवाज आणि गोगांटाचा त्रास होत असतो. होळीच्या दिवशी केतकीला सोसायटीमध्ये दिमडी वाजवण्याचा आणि लोकांचा खूप आावाज येत होता. या आवाजचा त्रास केतकीला झाला. त्यामुळे तिने अनेकदा सोसायटीमधील लोकांना आवाज न करण्याची विनंती केली. पण कोणीच ऐकले नाही. केतकीने या त्रासाला कंटाळून पोलिसांकडे तक्रार केली.

केतकीने एका महिलेला आवाजमुळे होणाऱ्या त्रासाबद्दल सांगितले तर त्या महिलेने केतकीसोबत भांडण केले. या महिलेचा व्हिडीओ तिने शेअर करत तिला होणाऱ्या त्रासाबद्दल सांगितले. तिला मानसिक आणि शारिरीक त्रास या आवाजामुळे सहन करावा लागला असे तिने या व्हिडीओमध्ये सांगितले आहे. 

फिट येणे ,आकडी, मिरगी, अपस्मार म्हणजेच एपिलेप्सि. या आजारात रूग्णाला कधीही अचानक झटका येऊ शकतो. हा आजार मेंदूशी निगडीत आहे. एपिलेप्सिबद्दल केतकी अनेक समाज प्रबोधनात्मक पोस्ट सोशल मिडीयावर शेअर करत असते. या पोस्टमधून ती एपिलीप्सी आजारबद्दलची माहिती नेटकऱ्यांना देते. काही दिवसांपूर्वी 'एक्सेप्ट एपिलेप्सि' नावाचा बॅंड घालून केतकीने फोटो शेअर केला होता.


 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

चीनच्या ताब्यातील जमीन परत मिळवणार ते मोफत वीज अन् उपचार; केजरीवालांच्या देशवासीयांना 10 गॅरंटी

Heeramandi : दारू पिऊन डान्स अन् 99 टेक्स; रिचाने सांगितला 'हिरामंडी'मधील गाण्यावरील नृत्याच्या शूटिंगचा किस्सा

MBBS: खोटी माहिती देत 'एमबीबीएस'ला प्रवेश, तरीही हायकोर्टाने फेटाळली पदवी रद्द करण्याची याचिका; वाचा नेमकं काय आहे प्रकरण

Eknath Khadse: "मी निवडणूक लढवणार नाही, पण..." राजकीय संन्यासाबाबत एकनाथ खडसे थेटच बोलले

Latest Marathi News Live Update : बराकपूरमध्ये नरेंद्र मोदींचा रोड शो

SCROLL FOR NEXT