actress madhuri dixit share marathi movie panchak trailer SAKAL
मनोरंजन

Panchak Trailer: "कोकणी भाषेचा गोडवा आणि विनोदाचा शिडकावा", माधुरी दीक्षितने शेअर केला 'पंचक'चा ट्रेलर

अभिनेत्री माधुरी दीक्षितने 'पंचक' मराठी सिनेमाचा ट्रेलर सर्वांसोबत शेअर केलाय

Devendra Jadhav

Panchak Trailer News: गेल्या अनेक दिवसांपासून मराठी मनोरंजन विश्वात विविध चित्रपट रिलीज होत आहेत. झिम्मा 2 सिनेमा सध्या चांगलाच गाजतोय.

अशातच आगामी पंचक सिनेमाची सर्वांना उत्सुकता आहे. विशेष गोष्ट म्हणजे... या सिनेमाची निर्मिती केलीय अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि डॉ. श्रीराम नेने या दोघांनी. नुकतंच पंचक सिनेमाचा ट्रेलर भेटीला आलाय.

पंचक सिनेमाचा ट्रेलर भेटीला

'पंचक' सिनेमाचा धमाकेदार ट्रेलर भेटीला आलाय. या ट्रेलरमध्ये सुरुवातीला दिसतं एका कुटुंबात एका व्यक्तीचा मृत्यू झालाय. पुढे त्याच कुटुंबात सर्वांच्या चेहऱ्यावर घबराट दिसते. कुटुंबातील एक व्यक्ती अंधश्रद्धेविरोधात आवाज उठवताना दिसतो. तर घरात पंचक लागल्याने 'आता कोणाचा नंबर' या भीतीने सगळ्यांची तारांबळ उडालेली दिसत होती.

पंचक सिनेमात दिग्गज कलाकारांची फौज

जयंत जठार, राहुल आवटे दिग्दर्शित या चित्रपटाचे डॉ. श्रीराम नेने आणि माधुरी दीक्षित नेने निर्माते आहेत तर नितीन प्रकाश वैद्य कार्यकारी निर्माते आहेत. आदिनाथ कोठारे, दिलीप प्रभावळकर, भारती आचरेकर, आनंद इंगळे, तेजश्री प्रधान, सतीश आळेकर, नंदिता पाटकर, सागर तळाशीकर, संपदा कुलकर्णी, आशिष कुलकर्णी, दीप्ती देवी, विद्याधर जोशी, आरती वडगबाळकर, गणेश मयेकर अशी मराठी सिनेसृष्टीतील मातब्बर मंडळी एकाच पडद्यावर पाहाण्याची संधी 'पंचक'च्या निमित्ताने मिळणार आहे. या चित्रपटाचे लेखन राहुल आवटे यांचे आहे.

या तारखेला पंचक होणार रिलीज

काही दिवसांपूर्वीच 'पंचक'चे उत्कंठा वाढवणारे टिझर सोशल मीडियावर झळकले होते. चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढलेली असतानाच आता या चित्रपटाचा ट्रेलर आज माधुरी दीक्षीतने शेअर केला. डॉक्टर श्रीराम नेने आणि माधुरी दीक्षित नेने प्रस्तुत 'पंचक' चित्रपटातील हे कोडे येत्या नवीन वर्षात म्हणजेच ५ जानेवारीला सुटणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Deshmukh: विधीमंडळात ज्या नितीन देशमुखांना मारहाण झाली ते नेमके कोण आहेत?

Kolhapur Killing Case : रेकॉर्डवरील गुन्हेगार लखन बेनाडेचा खून, संशयित आरोपी पोलिसांना शरण; संकेश्र्वरात मृतदेहाचा शोध सुरू

Morning Diet: सकाळी रिकाम्या पोटी कोणत्या गोष्टी खाऊ नयेत? डॉक्टरांनी सांगितले कारण

मे-जूनमध्ये शेतीत काम नसतं, शेतकरी रिकामेच असतात.. तेव्हा गुन्हेगारी वाढते; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याचं विधान

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींची कर्जप्रकरणे थंडबस्त्यात; अण्णाभाऊ साठे महामंडळातील वास्तव,नागपुरात केवळ एकाच महिलेला कर्ज!

SCROLL FOR NEXT