Actress Mayuri Deshmukh got Best Writer award 
मनोरंजन

मयुरी देशमुख ठरली 'सर्वोत्कृष्ट लेखिका'

सकाळवृत्तसेवा

'डिअर आजो' या नाटकासाठी अभिनेत्री मयुरी देशमुख हिला 'सर्वोत्कृष्ट लेखिका' हा पुरस्कार मिळाला आहे. आजोबा आणि नात यांच्या गोंडस तरीही संवेदनशील भावविश्वावर भाष्य करणारे हे नाटक आहे.

हेमंत आपटे निर्मित, अजित भुरे दिग्दर्शित या नाटकात संजय मोने आणि मयुरी देशमुख यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तर या नाटकाच्या लेखनाची धुराही मयुरीने सांभाळली आहे.  परिपक्व संहिता असलेल्या या नाटकाने प्रेक्षकांची वाहवा तर मिळवलीच, याव्यतिरिक्त या नाटकाने नुकताच ज्येष्ठ रंगकर्मी अशोक मुळ्ये यांच्या संकल्पनेतून सुरु करण्यात आलेला 'माझा पुरस्कार'ही पटकावला.

या नाटकासाठी मयुरीला 'सर्वोत्कृष्ट अभिनेत्री' आणि 'सर्वोत्कृष्ट लेखिका' या पुरस्कारांनी गौरवण्यात आले. थिएटर आर्ट्समध्ये मास्टर्स केलेल्या मयुरीने पाच वर्षांपूर्वीच हे नाटक लिहिले होते. लिखाणाच्या प्रयत्नाने लिहिलेली तिची ही कथा अनेक दिग्गजांना आवडली.

परंतु आपल्या लिखाणाच्या आवडीबद्दल मयुरी म्हणते, 'मी थिएटर आर्ट्सला असताना शफात खान आम्हाला नाट्यलेखन शिकवायचे आणि नाट्यलेखन मला खूप मजेशीर वाटले. काहीतरी आव्हानात्मक वाटले म्हणून मी लिखाणाला सुरवात केली.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sant Dnyaneshwar Maharaj palkhi: ज्ञानेश्वर माउली पालखी रथ बैलजोडीवरून वाद; रानवडे कुटुंबीयांना मान, मात्र देवस्थानचे पत्र नाही

मिथुन चक्रवर्ती यांना पहिल्या प्रेमात मिळालेला धोका, म्हणालेले...'ती सोडून गेली नसती तर आज मी...'

Pune Solapur Highway: धाराशिव आगाराची एसटी बस ब्रेक फेल; ४० प्रवासी थोडक्यात बचावले, चालकाने जीव धाेक्यात घातला, अन् काय घडलं!

Latest Marathi News Live Update : रात्री उशिरा घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात २९ रुपयांनी वाढ

Maharashtra Monsoon Update : मॉन्सूनची कोकणात दमदार एन्ट्री! राज्यातील 'या' २६ जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी

SCROLL FOR NEXT