actress nivedita saraf shared photo post with johnny lever after mi swara ani te dogha marathi drama play sakal
मनोरंजन

Nivedita Saraf: जॉनी भाऊ, तू आलास आणि.. अभिनेत्री निवेदिता सराफ यांची जॉनी लिवर साठी खास पोस्ट..

'मी स्वरा आणि ते दोघे’ नाटक पाहण्यासाठी पोहोचले जॉनी लिवर..

नीलेश अडसूळ

Nivedita Saraf: मराठी मनोरंजन विश्वातील एक दिग्गज नाव म्हणजे अभिनेत्री निवेदिता सराफ. गेली काही वर्ष सातत्याने त्या विविध मालिकांमधून आपल्या भेटीला येत आहेत. सध्या त्या कलर्स मराठी वरील 'भाग्य दिले तू मला' या मालिकेत मध्यवर्ती भूमिकेत आहेत. त्यांच्या या भूमिकेवर चाहते फिदा आहेतच. पण सध्या त्यांच्या नाटकाचीही जोरदार चर्चा आहे.

'मी स्वरा आणि ते दोघं' या त्यांच्या नाटकाची सध्या बरीच चर्चा आहे. या नाटकात निवेदिता सराफ प्रमुख भूमिकेत आहेत. विशेष म्हणजे या नाटकाला अनेक पुरस्कारही मिळाले आहेत. सध्या या नाटकाचे जोरदार प्रयोग सुरू असून, एक खास व्यक्ती या नाटकाला गेली होती. त्याच संदर्भात एक खास पोस्ट निवेदिता ताईंनी शेयर केली आहे.

(actress nivedita saraf shared photo post with johnny lever after mi swara ani te dogha marathi drama play)

नुकतंच त्यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्यांनी प्रसिद्ध अभिनेते जॉनी लिवर यांच्याबरोबरचा एक फोटो पोस्ट केला आहे. याला त्यांनी हटके कॅप्शन दिले आहे. कारण बॉलीवुड अभिनेते जॉनी लिवर यांनीही निवेदिता सराफ यांच्या नाटकाचं आस्वाद घेतला.

प्रयोगानंतर ते बॅकस्टेजला जाऊन निवेदिता ताईंना भेटले. त्यांचे भरभरून कौतुक केले. त्यांना नाटकही खूप आवडलं. हाच गोड क्षण निवेदिता यांनी सोशल मीडियावर शेयर केला आहे.

त्या म्हणतात, 'माझ्यासाठी हा खूप मोठा क्षण होता. माझा आवडता अभिनेता आणि एक उत्तम व्यक्ती असलेले जॉनी लिवर माझे ‘मी स्वरा आणि ते दोघं’ हे नाटक पाहायला आले. ही माझ्यासाठी एक फॅन मूव्हमेंट होती. त्यांनी या नाटकाचे आणि माझ्या अभिनयाचे कौतुक केले. मी तुमची खूप आभारी आहे, जॉनी भाई,' अशा शब्दात निवेदिता यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

‘मी स्वरा आणि ते दोघे’ हे नाटक सध्या रंगभूमीवर चांगलेच गाजताना दिसत आहे. या नाटकात निवेदिता यांच्याबरोबर सुयश टिळक, रश्मी अनपट हे कलाकारही प्रमुख भूमिकेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain: मुंबईसह ठाण्यात मुसळधार पाऊस! रस्त्यांवर काही ठिकाणी वाहतूक मंदावली, नागरिकांची तारांबळ

हॅप्पी दिवाळी! दिपिका-रणवीरने लेक 'दुआ'सोबत पहिल्यांदाच शेअर केला फोटो....

शेवटच्या ओव्हरमध्ये ४ धावा अन् सामना टाय... BAN vs WI सामन्यात ड्रामा; थरारक सुपर ओव्हरमध्ये लागला निकाल

Deglur ZP Elections : ग्रामीण भागात मिनी मंत्रालयाच्या निवडणुकीची धामधूम; शेतकऱ्यांच्या प्रश्नांना बगल

PESA Candidates Disqualification : पेसा भरतीतील २३ उमेदवारांचे भवितव्य धोक्यात; दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये कागदपत्रांची पूर्तता कशी करणार?

SCROLL FOR NEXT