Pooja Hegde disappointed by Indigo Airline service this time esakal
मनोरंजन

इंडिगो विमान कर्मचाऱ्यांवर पूजा हेगडेचा संताप..तक्रार करत केलेले ट्विट चर्चेत

सेलिब्रिटींनाच अशी वागणूक मिळतेय तर सामान्यांना कशी बागणूक दिली जाईल म्हणत नेटकऱ्यांनी देखील संताप व्यक्त केलाय.

सकाळ ऑनलाईन टीम

बॉलीवुड आणि टॉलीवुड अभिनेत्री पूजा हेगडे तिच्या ट्विटसाठी भलतीच चर्चेत आली आहे. पूजाने इंडिगो विमान कर्मचाऱ्यांवर संताप व्यक्त केलाय.एरवी लहान सहान गोष्टींवर ट्विट करत नसल्याचे तिने यावेळी सांगितले आहे.त्यामुळे इंडिगो कर्मचाऱ्यांची तक्रार करणारे ट्विट करण्यामागे निश्चितच मोठे कारण असावे.

पूजाने नेमकी ट्विटरवर काय तक्रार केली ?

"IndiGo6E या विमानाने मुंबईहून प्रवास करताना विपूल नावाच्या कर्मचाऱ्याने आम्हाला अत्यंत वाईट वागणूक दिली."(Pooja Hegde)अशी या कर्मचाऱ्याची तक्रार पूजाने केली.पुढे ट्विट करताना ती लिहीते,(Indigo Aeroplane)"तो आमच्याशी विनाकारण उद्धट आणि धमकीच्या स्वरात बोलत होता."पूजाच्या या ट्विटवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.'सेलिब्रिटींनाच अशी वागणूक मिळतेय तर सामान्यांना कशी बागणूक दिली जाईल' म्हणत नेटकऱ्यांनी देखिल संताप व्यक्त केलाय.

'अशा समस्यांवर मी ट्विट करत नाही पण हे खरच फार वाईट होतं', असं तिने म्हटलंय.(Tweet)पूजा हेडगेचे ट्विट बघून एकाने तर त्याची एअऱ इंडिगोची टिकीट देखिल कँसल केली आहे.मी कालच टिकीट बुक केलं होतं पण तुमचं ट्विट बघून टिकीट कँसल करतोय असे नेटकरी म्हणाला.पूजाच्या या ट्विटवर मात्र अद्यापही इंडिगो एअरलाईनकडून कुठलीही प्रतिक्रिया आलेली नाही.

पूजाने मोहेंजोदारो या चित्रपटातून बॉलीवुडमधे पदार्पण केले होते.आता येणाऱ्या सर्कस आणि कभी ईद कभी दिवाली या चित्रपटातून ती प्रेक्षकांपुढे येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : पुरुष 'लाडकी बहीण' कसे बनले? २६ लाख अपात्र असलेल्यांचे अर्ज मंजूर कसे झाले? वाचा नेमका कुठं घोळ झाला

Pension Dispute Assault : पेन्शनचे पैसे न दिल्याने पोरानं काठीने आईला केली मारहाण, पत्नी आडवण्यास गेली अन्

लफडं नवऱ्याला कळताच त्याचा हात तोडला अन् 10 वर्ष लहान भाच्यासोबत पळून गेली मामी, सोबत 13 वर्षाच्या मुलालाही नेलं

Nashik News : इंदिरानगरमधील वाढत्या छेडछाडीमुळे महिलांमध्ये भीतीचे वातावरण; पोलिसांचे तातडीने गस्त वाढवण्याचे आश्वासन

Mumbai News: कूपर रुग्णालयात घाणीचे साम्राज्य, रुग्णालय परिसरात अस्वच्छता

SCROLL FOR NEXT