
माझी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत निकषात न बसणाऱ्या अनेकांनी लाभ घेतल्याचं समोर आलंय. आतापर्यंत २६ लाखांपेक्षा जास्त लाभार्थ्यांना अपात्र ठरवण्यात आलंय. पावसाळी अधिवेशनात राज्य सरकारनेच याबाबत माहिती दिली होती. लाडकी बहीण योजनेसाठी एका पेक्षा जास्त योजनांचा लाभ घेणाऱ्या महिला, २ पेक्षा जास्त लाभार्थी महिला, पुरुषांनी अर्ज केल्याच्याही घटना समोर आल्या आहेत. अशा लाभार्थ्यांना अपात्र ठरवलं आहे. पण ह्या लाभार्थ्यांनी निकषात बसत नसताना या योजनेचा लाभ कसा घेतला असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत.