Tanuj Virwani Teamesakal
मनोरंजन

बॉलीवूडमध्ये इनसायडर नाही, रति अग्निहोत्रींचा मुलगा म्हणाला...

यापूर्वी तनूजनं इनसायडर ऐजमध्ये (Insider Edge) झळकला होता.

युगंधर ताजणे

मुंबई - बॉलीवूडमधील एकेकाळची प्रसिध्द अभिनेत्री रति अग्निहोत्री (actress rati agnihotri) या जवळपास 17 वर्षांपासून चित्रपट क्षेत्रापासून लांब आहेत. त्यांचा मुलगा तनुज (Tanuj) या क्षेत्रामध्ये येतो आहे. त्यानिमित्तानं त्यानं नेपोटिझमवर जी प्रतिक्रिया दिली आहे ती सर्वांच्या चर्चेचा विषय आहे. सोशल मीडियावरही ही प्रतिक्रिया मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे. तनुजच्या आगामी प्रोजेक्टविषयी सांगायचे झाल्यास त्याची डिझ्नी हॉटस्टार वर मर्ड़र मेरी जान नावाटी सीरिज येते आहे. त्याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. ( actress rati agnihotri son tanuj virvani nepotism inside edge actor says i am not bollywood insider)

तनुज विरवानी (Tanuj Virwani) आता ओटीटी (OTT) प्लॅटफॉर्मवर एक प्रसिध्द नाव झाले आहे.त्यानं चित्रपटाच्या माध्यमातून आपल्या करिअरला सुरुवात केली होती. मात्र त्याला खरी ओळख ही ओटीटीच्या माध्यमातून मिळाल्याचे दिसून आले आहे. आता त्यानं नेपोटिझमवर एक प्रतिक्रिया दिली आहे. जी सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे. ओटीटीला काही बंधने असली तरी प्रेक्षकांमध्ये त्याचा प्रभाव चांगला पडला आहे. त्या माध्यमातून वेगवेगळे नवनवीन कलाकार पुढे आले आहेत.

यापूर्वी तनूजनं इनसायडर ऐजमध्ये (Insider Edge) झळकला होता. त्याच्या त्या भूमिकेचे मोठ्या प्रमाणावर कौतूक झाले होते. तनुज म्हणतो, मला काही वेगळे करायचे आहे. एका वेगळ्या प्रोजेक्टच्या माध्यमातून काम करुन मला लोकप्रिय व्हायचे आहे. प्रेक्षकांना असे वाटायला नको की, मी एकाच पध्दतीच्या भूमिका करतो आहे. सध्या माझी मर्डर मेरी जान नावाची मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याच्यात हलकी फुलकी भूमिका केली आहे. मी त्यात एसीपी अधिका-याची भूमिका केली आहे.

मी बॉलीवू़डमध्ये आऊटसायडर आहे. तर गेल्या १७ वर्षांपासून माझी आई या क्षेत्रात आहे. त्यामुळे नेपोटिझमच्या बाबत कुणी काही बोलण्याचे कारण नाही. आतापर्यतच्या संघर्षमय वाटचालीतून मी माझे करिअर तयार केले आहे. प्रेक्षकांना माझे काम आवडले आहे. त्याची पोचपावती मिळते. ती केवळ नावाच्या वलयामुळे मिळत नाही. असेही तनुजनं यावेळी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SIR ECI PC: निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद गाजणार! १५ राज्यांसाठी SIR तारखा जाहीर होणार, पण कधी?

Ranji Trophy: अंजिंक्य रहाणेचं दीडशतक, मुंबई ४०० धावा पार; महाराष्ट्रासाठी विकी ओत्सवालच्या ६ विकेट्स, मिळवून दिली मोठी आघाडी

Pune Traffic Jam : पुण्यात कात्रज बोगदा ते वारजे पर्यंत प्रचंड वाहतूक कोंडी! , पुणेकर दीड तासांपासून अडकले

Akola Crime News : अक्षय नागलकर हत्याकांडातील आणखी चार आरोपींना अटक; ‘एलसीबी’ची मोठी कारवाई...

Latest Marathi News Live Update : गोपाल बदनेला 5 दिवसांची पोलिस कोठडी

SCROLL FOR NEXT