sherlyn chopra sakal media
मनोरंजन

Video: 'दीदी वेडं होऊन पेढा खातेय' शर्लिननं कुणाचे कान टोचले?

शर्लिन चोप्रा (sherlin chopra) हे नाव प्रेक्षकांसाठी नवं असं नव्हतं. मा

युगंधर ताजणे

.मुंबई - शर्लिन चोप्रा (sherlin chopra) हे नाव प्रेक्षकांसाठी नवं असं नव्हतं. मात्र बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा (shilpa shetty) पती राज कुंद्राला जेव्हा अटक झाली तेव्हा तिनं केलेली वक्तव्ये ही प्रसिद्धीच्या झोतात आली होती. त्यावरुन शर्लिन चोप्राच्या बाबत उलट सुलट प्रतिक्रियांना वेग आला होता. आताही शर्लिन चोप्रा ही तिच्या एका व्हिडिओमुळे चर्चेत आली आहे. त्यात तिनं अभिनेत्री शिल्पा शेट्टीवर ती खोटं बोलत असल्याचा आरोप केला होता. त्यामुळे फॅन्सला प्रश्न पडला आहे की, शर्लिनला नेमकं काय सांगायचं आहे ते, गेल्या काही दिवसांपासून राज कुंद्रा हा पॉर्नोग्राफी व्हिडिओच्या प्रकरणात न्यायालयीन कोठडीत आहे. त्यानं तीन वेळा जामीनासाठी अर्ज केला होता. मात्र त्याला अद्याप दिलासा मिळालेला नाही. त्यावर येत्या पुढील सुनावणीमध्ये काय निर्णय होतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दरम्यान शर्लिनच्या एका व्हिडिओनं सोशल मीडियावर जोरदार चर्चेला तोंड फोडले आहे. शर्लिननं एक व्हि़डिओ शेयर केला होता. त्यात तिनं सांगितलं की, शिल्पानं आतापर्यत जे काही सांगितलं आहे ते खोटं आहे. ती वेडं होऊन पेढा खात आहे. असा आरोप शर्लिननं शिल्पा शेट्टीवर केला आहे. त्यामुळे शिल्पाच्या चाहत्यांनी शर्लिनवर सडकून टीका केली आहे. त्याचं झालं असं की, शिल्पा शेट्टीनं शर्लिनच्या त्या व्हिडिओवर आपली बाजु पूर्णपणे मांडली होती. त्यावरुन शर्लिननं टीका केली आहे. शिल्पा शेट्टी नेहमीच आपली बाजु वेगळ्या पद्धतीनं मांडते. जेणेकरुन तिच्या भूमिकेविषयी प्रश्न विचारले जावेत. म्हणून मी यावेळी देखील तिच्याबाबत कडक भूमिका घेतली आहे.

राजच्या प्रकरणाविषयी बोलायचं झाल्यास त्याच्यावर मुंबई पोलिसांनी 1500 पानांचे दोषारोप पत्र दाखल केले आहे. त्या चार्जशीटमध्ये शिल्पा शेट्टीसह शर्लिन चोप्रासह अनेकांचे जवाब आहेत. पोलिसांनी आम्हाला राजच्या विरोधात आणखी पुरावे मिळाल्याचे न्यायालयात सांगितले होते. राजनं जे काही केलं त्याबद्दल आपल्याला काहीच माहिती नव्हते. आपण त्यावेळी दुसऱ्या कामात व्यस्त असल्याची प्रतिक्रिया तिनं दिली होती.त्यावर शर्लिननं तिच्यावर टीका केली आहे. तिच्यालेखी शिल्पा खोट बोलत आहे. राजने जे काही केले त्याची तिला पूर्ण माहिती होते. आपला पती एवढा मोठा उद्योग करतो आणि त्याची पत्नीला काहीच माहिती नसणं हे काही पटत नाही. असा प्रश्न शर्लिननं यावेळी उपस्थित केला आहे.

दिदीला काहीच माहिती नाही. तिला राज काय करतो याची कल्पना नाही. शर्लिननं एक व्टिट करुन व्हिडिओ शेयर केला आहे. काही मीडियाच्या रिपोर्टनुसार, दीदीचं असं म्हणणं आहे की, पतीच्या कारभाराविषयी आपल्याला काहीच माहिती नाही. हे म्हणजे वेडं होऊन पेढा खाण्यासारखं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Live Updates : अभिनेता सोनू सूद पंजाबमधील पूरग्रस्त भागांना भेट देण्यासाठी अमृतसर विमानतळावर दाखल

Karul Ghat Road Close : करूळ घाट प्रवासासाठी अतिशय धोकादायक, तज्ज्ञांकडून सर्वेक्षण; दरड हटविण्याचे काम थांबविले

Pitru Paksha 2025: आजपासून पितृपक्ष सुरू, नवपंचम राजयोगाचे दुर्मिळ संयोजन, 'या' 3 राशींसाठी सुरू होईल गोल्डन टाइम

Vijay Mallya : विजय माल्ल्या, नीरव मोदीचे लवकरच प्रत्यार्पण ? ब्रिटीश टीमने केला तिहार जेलचा दौरा

Ganpati Visarjan 2025 Live Updates : लालबागच्या राजाचं विसर्जन कसं होणार? अत्याधुनिक तराफ्यावर मूर्ती चढवण्यात अडचणी

SCROLL FOR NEXT