vidya balan parents first reaction to the dirty picture feeling worried  
मनोरंजन

विद्याच्या आईनं 'डर्टी' पाहिला, इंटरवलनंतर जे झालं...

सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई - बॉ़लीवूडमध्ये ज्या कुणी प्रसिध्द अभिनेत्री आहेत त्यात विद्या बालनचा चाहतावर्ग मोठा आहे. वर्षभरात एखादाच चित्रपट करुन पुढची अनेक वर्षे लोकप्रिय होणा-या विद्याच्या अभिनयाची गोष्टच वेगळी आहे. तिचा अभिनय पाहणे हा एक वेगळा आनंद असल्याची भावना तिच्या चाहत्यांची आहे. मागील वर्षी तिचा शकुंतला देवी चित्रपट प्रसिध्द झाला होता. त्यालाही मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांकडून प्रतिसाद मिळाला होता. त्यात विद्यानं एका गणिततज्ञ महिलेची भूमिका केली होती. सहज अभिनय करुन प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणा-या विद्यानं वेगळं स्थान बॉलीवूडमध्ये निर्माण केलं आहे.

द डर्टी पिक्चर मधून विद्याला घवघवीत यश मिळालं होतं. त्या चित्रपटानं तिला ग्लॅमर दिलं. मोठी प्रसिध्दीही मिळवून दिली. दाक्षिणात्य सिनेमातील सिल्क स्मिताच्या आयुष्यावर आधारित या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली होती. सिल्क स्मिता ही दक्षिणेतील प्रसिध्द अभिनेत्री होती. जेव्हा विद्यानं हा सिनेमा केला. आणि तो सिनेमा पाहण्यासाठी ती तिच्या आईला घेऊन थिएटरमध्ये गेली होती तेव्हा जे काय झाले ते तिनं एका मुलाखतीत सांगितले. विद्यानं त्या चित्रपटामध्ये एक बोल्ड भूमिका केली होती. मात्र ती प्रेक्षकांच्या पसंतीस पडली होती.

सिल्क स्मिताची भूमिका साकारणा-या विद्याला या चित्रपटानं अनेक पुरस्कार मिळवून दिले होते. त्यासाठी तिला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता. आता हा सिनेमा प्रदर्शित होऊन नऊ वर्ष झाली आहेत. विद्यानं जेव्हा आपल्या परिवारानं हा चित्रपट पाहिला होता तेव्हा त्यांची नेमकी भावना काय होती हे यावेळी सांगितले. टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या एका मुलाखतीत तिनं खुलासा केला आहे. ती म्हणाली, मी जेव्हा ही भूमिका करण्याचा निर्णय घेतला होता तेव्हा माझ्यावर फार दबाव होता. मानसिक ताणही होता तो म्हणजे आपण ही भूमिका योग्य प्रकारे करु की नाही याचा.

माझ्या घरच्यांचे मला नेहमीच समर्थन मिळाले आहे. त्यांनी सपोर्टही केला आहे. ही अभिमानाची गोष्ट म्हणावी लागेल. आई आणि वडिल दोघांनीही हा चित्रपट पाहिला होता. इंटरवल नंतर ते जेव्हा बाहेर आले तेव्हा वडिलांनी जोरात टाळी वाजवली. तर आई रडायला लागली होती.
 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'अटल सेतू' नंतर मुंबईत देशातील सर्वात लांब उड्डाणपूल बांधणार! पण कुठे अन् लांबी किती असणार? वाचा MMRDAचा नवा मास्टरप्लॅन

Women's World Cup: कसली, भारी इंग्रजी बोलते ही पोरगी! भारतीय महिलांनी वर्ल्ड कप जिंकला अन् Viral झाली ही... Video

'अमरेंद्र बाहुबली' री-रिलीज असूनही बाहुबली: द एपिकची रेकॉर्डब्रेक कमाई! प्रभासचा दबदबा कायम!

Mahur News : अचानक आलेल्या पुरातुन पर्यटक बालबाल बचावले....; नांदेड जिल्ह्यातील माहूर येथील घटना

Stock Market Closing : शेअर बाजाराचा सपाट पातळीवर व्यवहार! पण Lenskart IPO ची मोठी मागणी! कोणते शेअर्स चमकले ?

SCROLL FOR NEXT