adesh bandekar and kedar shinde emotional after watch baipan bhaari deva marathi movie SAKAL
मनोरंजन

Baipan Bhaari Deva: आदेश बांदेकर सिनेमा पाहून बाहेर आले आणि.. केदार शिंदे प्रचंड भावुक

केदार शिंदे यांचा बाईपण भारी देवा सिनेमा आदेश बांदेकरांनी पाहीला आणि त्यांनी बोलकी प्रतिक्रिया दिली.

Devendra Jadhav

Baipan Bhaari Deva news: केदार शिंदे दिग्दर्शित बाईपण भारी देवा सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला. या सिनेमाची सगळीकडे चर्चा होती. हा सिनेमा केदार शिंदे यांच्या आयुष्यातील महत्वाचा सिनेमा आहे.

महाराष्ट्र शाहीर नंतर केदार शिंदेंचा आणखी एक खास सिनेमा आहे. या सिनेमाकडून सध्या सगळ्याच स्तरांमधून प्रतिक्रिया आहेत. अशातच केदार शिंदे यांचा बाईपण भारी देवा सिनेमा आदेश बांदेकरांनी पाहीला आणि त्यांनी बोलकी प्रतिक्रिया दिली.

(adesh bandekar and kedar shinde emotional after watch baipan bhaari deva marathi movie)

केदार शिंदेंनी सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केलाय. या फोटोत आदेश आणि केदार यांनी एकमेकांना मिठी मारली आहे.

केदार शिंदे लिहितात.."गेली कित्येक वर्ष "होम मिनिस्टर" या कार्यक्रमाच्या निमित्ताने, दार उघड बये दार उघड म्हणत, वहिनींना मानाची पैठणी देणारा, त्यांचं मन जाणून घेऊन त्यांना बोलतं करणारा.. आदेशने काल बाईपण भारी देवा सिनेमा पाहून कडकडून मिठी मारली..

बायकांच्या जवळचा भावोजी जेव्हा अशी प्रतिक्रिया देतो तेव्हाच कळून चुकतं की, आपल्याला बायकांच्या मनातलं नुसतं ऐकू नाही तर समजू लागलंय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.

एकूणच आदेश बांदेकरांना बाईपण भारी देवा सिनेमा आवडला असं म्हणता येईल. आदेश बांदेकर यांची पत्नी आणि सुप्रसिद्ध अभिनेत्री सुचित्रा बांदेकर या सिनेमात अभिनय करत आहेत.

जिओ स्टुडियोजचा 'बाईपण भारी देवा' हा चित्रपट प्रत्येक स्त्रीला आता स्वतःसाठी देखील जगायला शिकवणार हे नक्की.. तेव्हा आता तयार रहा.. केदार शिंदेंचा स्पेशल टच असलेला, सहा गुणी अभिनेत्रींनी चित्रपटात उडवलेली धमाल, अनुभवायला!

जिओ स्टुडिओज प्रस्तुत, माधुरी भोसले आणि जिओ स्टुडिओज निर्मित, बेला शिंदे-अजित भुरे सह-निर्मित आणि केदार शिंदे दिग्दर्शित 'बाईपण भारी देवा' हा चित्रपट आपल्या भेटीसाठी सज्ज झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ट्विटरवर 'पॉर्नबंदी'? अडल्ट कंटेंट ब्लॉक केल्याचा दावा, युजर्सचा संताप

पुण्यात होळीच्या कार्यक्रमावेळी दुर्घटना, लाइटचा गर्डर कोसळून १५ तरुण-तरुणी जखमी; चौघांवर ससूनमध्ये उपचार सुरू

Kolhapur Accident News : कोल्हापूर गगनबावडा राष्ट्रीय मार्गावर भीषण अपघात, दूध वाहतूक टेम्पोचा ब्रेक फेल; तीन दुचाकीला उडविले

Atharva Birari : नवलच! वयाच्या २२ व्या वर्षी नाशिकचा अथर्व बिरारी झाला 'सीए'; पहिल्याच प्रयत्नात देशात ४० वा!

मुंबईहून दुबईला निघालेलं विमान, उतरण्याआधी आला मिसाइल अलर्ट; हवेतच 'डबल रिवर्स'ची दुर्मिळ घटना, काय घडलं?

SCROLL FOR NEXT