Adipurush Makers copied film posters and certain scened aleeges this animation studio Instagram
मनोरंजन

Adipurush: 'थोडीतरी लाज बाळगा..' म्हणत सिनेमाच्या मेकर्सवर होतोय पोस्टर चोरीचा आरोप, वाचा प्रकरण

'आदिपुरुष' सिनेमातील कलाकारांच्या लूकवरनं वादळ उठलं असताना आता हा नवीन पोस्टर चोरीचा आरोप चक्रावून टाकणारा आहे.

प्रणाली मोरे

Adipurush Controversy: ओम राऊतचा सिनेमा आदिपुरुष भोवती घोंघावणारं वादाचं वादळ काही थांबायचं नाव घेईना. एकीकडे सिनेमाच्या व्हीएफक्स वरनं खिल्ली उडवली जातेय आणि सिनेमातील राम,रावण,हनुमानाच्या लूकवर तर लोकांचा भडका उडाला आहे. मुकेश खन्नापासून पुनीत इस्सर पर्यंत सर्वच सेलिब्रिटींनी आदिपुरुषमधील सैफच्या रावण लूकवर आगपखड केली आहे. त्यांचे म्हणणे आहे की,हा रावण वाटत नसून खिलजी,तालिबानी जास्त वाटत आहे. या वादात आता आणखी एका नव्या वादानं एन्ट्री केलीय ते म्हणजे मेकर्सवर पोस्टर चोरीचा आरोप लावला जात आहे.(Adipurush Makers copied film posters and certain scened aleeges this animation studio)

एनिमेशन स्टुडिओने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीत एक कोलाजा शेअर केला आहे. यामध्ये एका बाजूला आदिपुरुषचा फर्स्ट लूक पोस्टर आहे आणि दुसरीकडे स्टुडियोनं बनवलेला पोस्टर आहे,म्हणजे त्यांचे एनिमेटेड वर्क म्हणू शकतो आपण त्याला. या स्टुडिओचं नाव 'वानरसेना स्टुडिओ' आहे. या स्टुडियोनं आदिपुरुषच्या मेकर्सवर चोरीचा आरोप लावला आहे आणि आपल्या इन्स्टा स्टोरीत लिहिलं आहे की,''असं वाटत आहे की आदिपुरुषच्या मेकर्सना फर्स्ट लूक पोस्टरसाठी भगवान शंकराच्या या फोटोतून प्रेरणा मिळाली आहे, ही खूपच लज्जास्पद गोष्ट आहे. टीसीरिजला कमीत कमी ओरिजनल क्रिएटरला क्रेडिट द्यायला हवं होतं,ज्यानं मोठ्या मेहनतीने हे आर्टवर्क बनवलं आहे. हे पाहून खूप दुःख होत आहे की आमच्या कामाला अशा पद्धतीनं कॉपी किंवा चोरी केलं जात आहे''.

Adipurush Makers copied film posters and certain scened aleeges this animation studio

स्टुडिओनं पुढे म्हटलंय की,''अर्थात ही अशाप्रकारची चोरी आधी देखील अनेकवेळा झाली आहे पण फरक एवढाच आहे की आता हे थोडं फनी वाटतंय. आम्हाला या गोष्टीवरनं वाद घालायचा नाही. लढण्यापेक्षा आम्ही अधिक चांगलं काम तुम्हाला करुन देऊ शकतो आणि असं बोलत स्टुडियोनं टीझरमधल्या एका सीनला शेअर केला आहे, जो अगदी हुबेहुब एनीमेटेड सीनसारखाच आहे, म्हणजे इथे पण चोरीच केलेली दिसतेय. हे शेअर करत पुढे स्टुडिओनं लिहिलं आहे-काहीतरी लाज बाळगा''.

Adipurush Makers copied film posters and certain scened aleeges this animation studio

आदिपुरुषमध्ये प्रभासनं श्रीराम यांची व्यक्तीरेखा साकारली आहे तर सैफ अली खाननं रावणाची. तर कृति सनन सीतामय्या बनली आहे. याच सिनेमात मराठी कलाकार देवदत्त नागे हनुमान साकारताना दिसणार आहे. हा सिनेमा १२ जानेवारी २०२३ रोजी रिलीज होणार आहे. पण सिनेमाविषयी जसे वाद समोर येत आहेत सोशल मीडियावर त्यावरनं तरी जरा सगळं कठीणच दिसत आहे. सोशल मीडियावर सिनेमावर बंदी आणण्याची मागणी केली जात आहे. त्यामुळे सिनेमाच्या रिलीजवर टांगती तलवारच असणार असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : पुण्यातील चव्हाण वाडात चिमण्या गणपती जवळ आगीची घटना

World Cup 2025, INDW vs ENGW: दीप्ती शर्माने घडवला इतिहास! 'असा' पराक्रम करणारी भारताची पहिलीच महिला क्रिकेटपटू

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात सात दिवस धोक्याचे! पावसाबाबत मोठी अपडेट समोर, हवामान विभागाकडून इशारा जारी

Lawrence Bishnoi: वेळीच स्वतःला सुधारा नाहीतर...; लॉरेन्स बिश्नोई टोळीला उघड इशारा, धमकी देणारा रोहित गोदरा नेमका कोण?

IND vs AUS: पहिला वनडे सामना हरूनही कर्णधार शुभमन गिल समाधानी; कारण सांगताना म्हणाला, 'या मॅचने आम्हाला...'

SCROLL FOR NEXT