adipurush Prabhas opens question of marriage, reveals the venue of the wedding directly SAKAL
मनोरंजन

Prabhas Adipurush: लग्नाच्या प्रश्नावर प्रभासचा चेहरा खुलला, फॅन्सच्या प्रश्नावर थेट लग्नाचं स्थळ सांगून मोकळा झाला

फायनल ट्रेलर लाँच वेळी प्रभासने त्याच्या लग्नाबद्दल मोठा खुलासा केलाय

Devendra Jadhav

Prabhas Adipurush Movie News: आदिपुरुष सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. सिनेमात श्रीरामाची भूमिका साकारली आहे अभिनेता प्रभासने. प्रभासने आदिपुरुषच्या फायनल ट्रेलरमध्ये दमदार ऍक्शन दिसत आहे.

काल ६ जूनला तिरुपतीला प्रभास आणि आदिपुरुषच्या टीमच्या उपस्थितीत भव्य दिव्य फायनल ट्रेलर लाँच झाला. यावेळीच प्रभासने त्याच्या लग्नाबद्दल मोठा खुलासा केलाय.

(adipurush Prabhas opens question of marriage, reveals the venue of the wedding directly)

फॅनचा प्रश्न अन् प्रभासचं भन्नाट उत्तर

आदिपुरुषमध्ये श्रीरामाची भूमिका साकारणाऱ्या प्रभासने दिलेल्या उत्तराने चाहत्यांना चर्चांना विषय मिळाला आहे. अलीकडेच आदिपुरुषचा अंतिम ट्रेलर लाँच करण्यात आला, जिथे प्रभासला त्याच्या चाहत्यांनी बरेच प्रश्न विचारले.

मोस्ट हँडसम बॅचलरच्या यादीत प्रभास पहिल्या क्रमांकावर आहे, त्यामुळे चाहते त्याच्या लग्नाबद्दल खूप उत्सुक आहेत. आता एका चाहत्याने प्रभासला लग्नाबद्दल प्रश्न विचारला.. एरवी प्रभास या प्रश्नाचं उत्तर टाळतो पण यंदा मात्र प्रभासने थेट लग्नाचं ठिकाणच सांगितलं.

प्रभासचे अफेअर

काही दिवसांपूर्वी प्रभासचे नाव अनुष्का शेट्टीसोबत जोडले जात होते. यानंतर त्याचे नाव आदिपुरुषची को-स्टार क्रिती सेननसोबत जोडले जात होते.

अशा परिस्थितीत फॅन प्रभासला प्रश्न विचारणार नाहीत ते नवल. यंदा प्रभासने लग्नाची तारीख सांगितली नसली तरी स्थळ निश्चितपणे सांगितले आहे.

तिरुपतीमध्ये करणार लग्न..

तिरुपतीमध्येच लग्न करणार असल्याचे प्रभासने सांगितले. प्रभासचे हे उत्तर ऐकून चाहत्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकला. प्रभासच्या फॅन्सना आता त्याच्या लग्नाची उत्सुकता लागली आहे. अशा परिस्थितीत बाहुबली स्टार लवकरच विवाहबंधनात अडकण्याची शक्यता आहे.

मात्र, ट्रेलर लॉन्चवेळी प्रभास एकदम आनंदी मूडमध्ये दिसला. आता प्रभास क्रिती सोबत लग्न करणार की आणखी कोणासोबत याचा उलगडा येत्या काळात होईलच. दरम्यान प्रभासची भूमिका असलेला आदिपुरुष सिनेमा १६ जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

दरम्यान तिरुपतीमध्ये प्रभासच्या आदिपुरुषच्या चित्रपटाचे खास स्क्रिनिंग आयोजित करण्यात आले आहे. त्यानिमित्तानं जी तयारी करण्यात आली आहे ती मोठी होती.

आदिपुरुषचा जो इव्हेंट आहे तो श्री वैंकटश्वेरय्या विद्यापीठाच्या मैदानात होणार आहे. त्यासाठी प्रभासचे ५० फुटांपेक्षा अधिक उंचीचे कट आऊट्स तयार करण्यात आले आहे. मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tilak Varma Injury: तिलक न्यूझीलंडविरुद्ध T20 सामन्यांतून बाहेर, वर्ल्ड कपमध्ये खेळणार की नाही? BCCI ने दिले महत्त्वाचे अपडेट्स

Pune Election : शहरातील क्रीडा संकुल, शाळा-महाविद्यालयांत मतमोजणी केंद्रे तयार!

Maharashtra Police Foundation Day : "शहर सुरक्षेसाठी पोलिस, नागरिकांचा एकत्रित सहभाग महत्त्वाचा"- अमितेश कुमार!

Congress Manifesto: ‘पुणे फर्स्ट’चा नारा! पुण्यासाठी काँग्रेस काय करणार? जाहिरनाम्यात नेमकं काय?

Pune Traffic : "शहरात ‘कमी खर्चाचे’ वाहतूक व्यवस्थापन यशस्वी; कोंडी निम्म्याने कमी"- अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज पाटील!

SCROLL FOR NEXT