aditya narayan get marry to shweta post viral
aditya narayan get marry to shweta post viral 
मनोरंजन

आदित्य नारायण बांधणार श्वेताच्या नावाच्या मुंडावळ्या

सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई - प्रख्यात गायक उदित नारायण यांचा मुलगा गायक आदित्य नारायण हा आता विवाहबंधनात अडकणार आहे. त्याने आपल्या इंस्टाग्रामच्या अकाऊंटवरून ही माहिती शेयर केली आहे. तो प्रसिध्द गायक नेहा कक्कर हिच्याशी लग्न करणार अशी चर्चा मीडियातून समोर येत होती. प्रत्यक्षात गेल्या आठवडाभरापूर्वी  नेहा कक्कर गायक रोहनप्रीत बरोबर विवाहबध्द झाली. त्यानंतर आदित्यनेही आता आपल्या लग्नाची तयारी सुरु केली आहे.

आदित्य हा त्याची गर्लफ्रेंड श्वेता अग्रवाल हिच्याशी लग्न करणार आहे. मागील काही दिवसांपासून ते रिलेशनशीपमध्ये होते. त्यावेळी त्याने आपल्या नात्याची कबूली दिली होती. आता त्याने आपण तिच्याबरोबर विवाहबंधनात अडकणार असल्याचे सांगितले आहे. त्याच्या या पोस्टवर चाहत्यांनी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. आदित्यने त्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, आम्ही आता लग्न करणार आहोत. मी सगळ्यात नशीवान मुलगा आहे याचे कारण म्हणजे मला श्वेतासारखी मुलगी भेटली. आता फायनली आम्ही डिसेंबरमध्ये लग्न करणार आहोत.

आम्हा दोघांनाही आमची स्पेस हवी आहे. त्यासाठी लग्नाला मोजक्याच व्यक्तींची उपस्थिती ठेवण्यावर भर दिला जाणार आहे. लग्न ही आमची वैयक्तिक बाब असल्याने आता पुढील काळात जास्त वेळ सोशल मीडियावर अॅक्टिव्ह राहणार नसल्याचेही त्याने सांगितले.

काही वर्षांपूर्वी माझे आणि श्वेताचे ब्रेकअप झाले अशीही चर्चा होती. लोकांनी ती सुरु केली. तेव्हा श्वेताला घराबाहेर पडणेही अवघड झाले होते. तिला यासगळया गोष्टींचा खूप त्रास झाला. नातं म्हटलं की त्यात चढ उतार येतात. आम्ही त्या परिस्थितीतून गेलो आहे. एवढा वेळ एकत्र घालवल्यानंतर आता आम्हाला असे वाटते की, आम्ही लग्न करायला हवे. असे आदित्यने यावेळी सांगितले. 

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'पवित्र ग्रंथ गुरु साहिब'ची पानं गुरुद्वारात घुसून फाडली! जमावाच्या बेदम मारहाणीत तरुणाचा मृत्यू

Nick Jonas: देसी गर्ल प्रियांका चोप्राचा पती निक जोनासची तब्येत बिघडली; व्हिडीओ शेअर करत म्हणाला...

Job Discrimination : मुंबईत नोकरी, पण मराठी माणसालाच नो एन्ट्री? लिंक्डइनवरील पोस्ट होतेय व्हायरल

Samruddhi Accident: समृद्धी महामार्गावरील अपघात कधी थांबणार? कारला मागून धडक दिल्याने तिघांचा मृत्यू

Bhavesh Gupta:'पेटीएम'च्या अध्यक्षांचा कंपनीला रामराम, तडकाफडकी घेतला करिअर ब्रेकचा निर्णय

SCROLL FOR NEXT