aditya narayan
aditya narayan  Team esakal
मनोरंजन

आदित्य नारायणचं ट्रान्सफॉर्मेशन पाहिलंय ? दोन महिन्यात फिट

युगंधर ताजणे

मुंबई - बॉलीवूड सेलिब्रेटी (bollywood celebrity) आणि सध्या लोकप्रिय अशा इंडियन आयडॉल (indian idol) कार्यक्रमाचा निवेदक आदित्य नारायण याने आपल्या ट्रान्सफॉर्मेशनचा फोटो शेअर केला आहे. आदित्य आणि त्याची पत्नी श्वेता हे सोशल मीडियावर चर्चेत असणारे सेलिब्रेटी आहेत. त्यांची लोकप्रियताही मोठी आहे. आदित्यच्या या फोटो पोस्टला चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. गेल्या काही दिवसांपासून इंडियन आयडॉल हा शो वादाच्या भोव-यात सापडल्याचे दिसुन आले आहे. ( aditya narayan shares his transformation photos made himself fat to fit)

कोरोनातून बरं झाल्यानंतर आदित्यनं (aditya after two months) दोन महिन्यानंतर आपल्या ट्रान्सफॉर्मेशनचे फोटो टाकले होते. त्यात आदित्यच्या फॅन्सनं त्याचं कौतूक केलं आहे. आदित्यनं त्याच्या इंस्टावरुन काही फोटो शेअर केले आहेत. त्याला चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट केल्या आहेत. त्या पहिल्या फोटोमध्ये आदित्यनं वजन वाढल्याचा फोटो शेअर केला आहे. फोटोला कॅप्शन देताना त्यानं म्हटलयं..15 एप्रिल 2021 मध्ये माझा कोरोनाचा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता.

त्यानंतर आदित्यनं आपला एक फोटो शेअर केला होता. त्यात आदित्य आपली फिट बॉडीविषयी सांगतो आहे. आदित्यचा दुसरा फोटो 15 जुनचा आहे. त्यात आदित्य एकदम फिट दिसतो आहे. त्या फोटोला आदित्यनं कॅप्शन दिलयं, मला माहिती आहे, सध्या तुम्ही मला अशा स्वरुपामध्ये स्वीकारणार नाही. मात्र मी ही परिस्थिती बदलणार आहे. त्याच्या या पोस्टला आदित्यच्या चाहत्यांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला आहे.

आदित्य आणि त्याची पत्नी श्वेता अग्रवाल हे दोघेही कोरोना पॉझिटिव्ह झाले होते. त्यांनी त्याची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केली होती. त्यावेळी आदित्यची प्रकृती एवढी गंभीर होती की, त्याला एका रुग्णालयामध्ये भरती करावं लागलं होतं. पुढे काही दिवसांनंतर आदित्य आणि त्याची पत्नी त्या जीवघेण्या आजारातून बाहेर आले. आदित्यनं पुन्हा इंडियन आयडॉलच्या सेटवर कमबॅक केले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Best Saving Plan : दिवसाला फक्त २५० रुपये सेव्हिंग करा अन् २४ लाख रुपये मिळवा; लखपती बनवणारी सरकारी स्कीम

MI vs KKR IPL 2024 : IPL मधून मुंबई इंडियन्सचा पत्ता कट होणे टीम इंडियासाठी ठरणार गोड बातमी? जाणून घ्या कारण

Pension Department: पेन्शनधारकांना मोदी सरकारची मोठी भेट! नवीन ऑनलाइन पोर्टल केले लाँच; मिळणार 'या' सुविधा

Latest Marathi News Live Update: राहुल गांधींना 'शेहजादा' म्हणणाऱ्या पंतप्रधान मोदींवर प्रियंका गांधींचा हल्लाबोल

Indian Navy : अरबी समुद्रात पुन्हा भारतीय नौदलाची हवा, 20 पाकिस्तानींसाठी ठरले देवदूत

SCROLL FOR NEXT