Marathi Movie Sakal
मनोरंजन

Marathi Movie: कोरोनानंतर मराठी चित्रपटसृष्टीने मारला चौकार

कोरोनानंतर पहिल्यांदाच एकाच दिवशी चार चित्रपट प्रदर्शित झाले आहेत.

संतोष भिंगार्डे

मुंबई : कोरोना महामारीमुळे गेली दोन वर्षे चित्रपटसृष्टी ठप्प झाली होती. परंतु आता हळूहळू सगळे व्यवहार सुरळीत सुरू होत आहेत. सरकारच्या परवानगीनुसार पन्नास टक्के प्रेक्षकांच्या उपस्थितीत चित्रपटगृहे सुरू झाली आहेत. हिंदीमधील एकेका चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखा जाहीर होत आहेत. मात्र यामध्ये एक पाऊल पुढे टाकले आहे.

मराठी चित्रपटसृष्टीने. कोरोना महामारीनंतर एकाच दिवशी चार मराठी चित्रपट आज प्रदर्शित झाले आहेत. पांघरूण, फास, लोच्या झाला रे आणि लाॅ आॅफ लव्ह अशी त्या चित्रपटांची नावे असून मराठीने चित्रपट प्रदर्शित करण्याचा चौकार मारला आहे. आता हळूहळू सगळेच रखडलेले चित्रपट प्रदर्शित होणार आहेत.

महेश मांजरेकर यांचा पांघरूण या चित्रपटाने अनेक मानाच्या चित्रपट महोत्सवात हजेरी लावलेली होती. या चित्रपटाला पुरस्कारही लाभलेले आहेत. ही एक वेगळी प्रेमकथा आहे आणि यामध्ये अभिनेता अमोल बावडेकर आणि अभिनेत्री गौरी इंगवले यांच्या प्रमुख भूमिका आहेत. दिग्दर्शक अविनाश कोलते यांचा अनेक चित्रपट महोत्सवांमध्ये गौरविला गेलेला फास हा चित्रपटदेखील आजच प्रदर्शित झाला आहे. उपेंद्र लिमये, सयाजी शिंदे आणि कमलेश सावंत यांच्या प्रमुख भूमिका आहेत. अभिनेता अंकुश चौधरी, सयाजी शिंदे, सिद्धार्थ जाधव आणि अभिनेत्री वैदेही परशुरामी यांच्या प्रमुख भूमिका असलेला मनोरंजनात्मक असा लोच्या झाला रे हा चित्रपटही प्रदर्शित झाला आहे.

परितोष पेंटर आणि रवी अधिकारी या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. ''लॉ ऑफ लव्ह'' या चित्रपटात शाल्वी शहा मुख्य भूमिकेत आहे. हा रोमँटिक जॉनरचा चित्रपट या प्रेक्षकांच्या भेटीला आजचा आला आहे. या चारही चित्रपटांचे विषय वेगवेगळे आहेत आणि प्रेक्षक नक्कीच त्यांचे चांगले स्वागत करतील अशी आशा आहे. एकाच दिवशी चार चित्रपट प्रदर्शित झाल्यामुळे मराठीत आनंद व्यक्त केला जात आहे. मराठीची गाडी हळूहळू व्यवस्थित रुळावर येत आहे असे बोलले जात आहे.

याबाबत पांघरूण चित्रपटाचे कार्यकारी निर्माते मंगेश जगताप म्हणाले, की झिम्मा, पांडू या चित्रपटांना प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिला. आताही प्रदर्शित झालेल्या चित्रपटांना प्रेक्षक उत्तम प्रतिसाद देतील अशी आशा आहे. कोरोनानंतर एकाच वेळी चार चित्रपट प्रदर्शित होणे ही मराठीसाठी आनंदाची बाब आहे.

सोयरिक चित्रपटाचे निर्माते विजय शिंदे म्हणाले, की मराठी चित्रपटांना चांगली थिएटर्स आता मिळाली होती. मराठी चित्रपटांना उत्तम प्रतिसाद मिळत आहे. तरीही प्रेक्षकांनी अधिकाधिक पाठिंबा आणि सहकार्य मराठी चित्रपटांना करावे अशी अपेक्षा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chiplun Crime : प्रेयसीसाठी मृतदेहाची लावली विल्हेवाट? हाडांच्या तुकड्यांनी उघड केलं 4 लाखांच्या बदल्याचं भयंकर गुपित, मुंबईतील महिलेला अटक

'ते ज्येष्ठ आहेत म्हणून मी घाबरलं पाहिजे असं...' प्रसिद्ध अभिनेत्री नाना पाटेकरांबद्दल बोलताना म्हणाली...'मी कोणालाच घाबरत...'

Latest Marathi News Live Update : किल्ले रायगडावरील शिवसमाधी परिसरात लावलेला अनधिकृत बोर्ड रायगड जिल्हाध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी काढून टाकला

College Student Death : शिक्षणाला कंटाळून सावंतवाडीत 17 वर्षीय विद्यार्थ्यानं गॅलरीतून उडी मारून संपवलं आयुष्य; चिठ्ठीतील मजकुराने उडाली खळबळ

High Court: आधी सेक्स नंतर ब्लॅकमेल... असंच सुरू राहीलं तर सुसंस्कृत समाजात राहणे कठीण; हायकोर्टाने दिले कारवाईचे आदेश!

SCROLL FOR NEXT