after subhedar digpal lanjekar new movie based on marathvada muktisangram
after subhedar digpal lanjekar new movie based on marathvada muktisangram  SAKAL
मनोरंजन

CM Eknath Shinde: सुभेदार नंतर दिग्पाल लांजेकर दाखवणार मराठवाडा मुक्तिसंग्रामाची कथा, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मुहूर्त

Devendra Jadhav

Subhedar Movie News: सुभेदार हा मराठी सिनेमा बॉक्स ऑफीसवर तुफान यश मिळवत आहे. सुभेदार सिनेमानिमित्ताने शिवराज अष्टकमधील पाचवा सिनेमाही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला.

सुभेदार सिनेमानंतर दिग्पाल लांजेकरांच्या पुढील प्रोजेक्टची घोषणा झालीय. या प्रोजेक्टची पहिली झलक समोर आलीय. दिग्पाल लांजेकरांच्या आगामी प्रोजेक्टची कथा आहे मराठवाडा मुक्तिसंग्रामाची. जाणुन घ्या सविस्तर...

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नवीन सिनेमाचा झाला शुभारंभ

मुक्तिसंग्राम : कथा मराठवाड्याच्या संघर्षाची या नाट्य माहितीपटाचा मा. मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शुभारंभ झाला. सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाची निर्मिति यांनी केलंय.

सुभेदार नंतर या माहितीपटाच्या माध्यमातुन दिग्पाल लांजेकर पुन्हा एकदा दिग्दर्शनाची धुरा सांभाळणार आहेत.

काय आहेत या माहितीपटाची वैशिष्ट्ये

मुक्तिसंग्राम : कथा मराठवाड्याच्या संघर्षाची या माहितीपटाचा शुभारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाला. या माहितीपटाती वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे

१. मुक्तिसंग्राम : कथा मराठवाड्याच्या संघर्षाची हा डॉक्यु ड्रामा प्रकार आहे. म्हणजेच उपलब्ध कागदपत्रे आणि नाट्यरूपांतर यांची योग्य पद्धतीने सांगड घालून तयार केलेला माहितीपट.

२.खालील उपलब्ध पुस्तके, संदर्भ यांचा सखोल अभ्यास करून संहिता लिहिली आहे.
सिलेक्टेड करस्पॉन्डन्स ऑफ सरदार वल्लभभाई पटेल, हैद्राबादचा स्वातंत्र्यसंग्राम आणि मराठवाडा.

३.ब्रिटिशकालीन वृत्तवाहिन्यांवरील मूळ उपलब्ध व्हिडिओंचा अभ्यास करून त्याचा योग्य पद्धतीने वापर केला आहे.

४.केवळ १२ दिवसात हा ७५ मिनिटांचा माहितीपट तयार करण्यात आला आहे.

हे कलाकार साकारणार प्रमुख भुमिका

मुक्तिसंग्राम : कथा मराठवाड्याच्या संघर्षाची या माहितीपटात अभिनेता अक्षय वाघमारे आणि अभिनेत्री पूजा पुरंदरे हे मराठी कलाकार प्रमुख भुमिका साकारत आहेत.

अक्षय वाघमारे या माहितीपटात नागनाथ परांजपे तर पूजा ताराबाई परांजपेची भुमिका साकारत आहे. या दोघांच्या भुमिकेची पहिली झलक समोर आली असुन चाहत्यांनी पसंती दिलीय

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : राज्यातील मतदारसंघांत कुठे रांगा, तर कुठे निरुत्साह

Loksabha Election 2024 : कासवगतीने कासावीस! मतदार चार तास रांगेत

Monsoon : पावसाचा जोर, केरळ ‘अलर्ट मोड’वर

BSP Party : बसपची अस्तित्वाची लढाई; मायावतींचा दबदबा झपाट्याने कमी होऊ लागला

Uddhav Thackeray : मतदान केंद्रात मतदारांकडे दोन ते तीन वेळा ओळखपत्र विचारून ‘जाणीवपूर्वक विलंब’

SCROLL FOR NEXT