Actress swara  bhasker
Actress swara bhasker File
मनोरंजन

स्वराचं खरं नाही; हिंदूत्ववाद्यांना म्हणाली तालिबानी, गुन्हा दाखल

युगंधर ताजणे

मुंबई - बॉलीवूडची अभिनेत्री स्वरा भास्कर swara bhaskar पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. त्याचे कारण तिनं काल एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यामुळे ती वादाच्या भोवऱ्यात सापडली होती. वास्तविक स्वरा आणि कंगना या दोन्ही अभिनेत्री त्यांच्या वादग्रस्त स्वभावामुळे ओळखल्या जातात. त्यांना कुठल्याही विषयावर बोलणं वर्ज्य नाही. सध्या जगभरात एक विषय मोठ्या प्रमाणावर चर्चिला जात आहे. तो म्हणजे अफगाणिस्तान आणि तालिबान. आता तालिबान्यांनी अफगाणिस्तानमध्ये आपली सत्ता स्थापन केल्याचे दिसुन आले आहे. अशा परिस्थितीवर अभिनेत्री स्वरा भास्करनं एक व्टिट केलं आहे. त्यात तिनं तालिबान्यांची तुलना हिंदूत्ववाद्यांशी केली आहे. याचा राग कंगनालाही आला होता. तिनं त्यावरुन स्वराला झाडलंही. मात्र स्वरावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे ती चर्चेत आली आहे.

काल पासून अरेस्ट स्वरा भास्कर arrest swara bhaskar नावाचा ट्रेंडही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सुरु झालायं. दिल्लीतील वकिल अशोक चैतन्य यांनी दिल्ली पोलिसांकडे याप्रकरणी स्वराच्या विरोधात गुन्हाही दाखल केला आहे. त्यांनी सांगितलं की, आपण स्वरानं केलेल्या बेताल वक्तव्यांच्या विरोधात पोलिसांकडे तक्रार केली आहे. यानंतर पोलीस तपास करुन तिच्यावर कारवाई करतील. असेही त्यांनी सांगितलं आहे. स्वरानं आपल्या व्टिटमध्ये हिंदूत्ववाद्यांच्या विरोधात वादग्रस्त प्रतिक्रिया दिली होती. त्यामुळे ती चर्चेत आली होती.

स्वरानं आपल्या व्टिटमध्ये म्हटले होते की, आपण हिंदूत्ववाद्यांच्या दहशतवादासमोर टिकाव धरु शकणार नाही. आणि आता आपण तालिबान्यांच्या आक्रमणामुळे चिंताग्रस्त झालो आहोत. आपल्याला त्यामुळे मोठा धक्काही बसला आहे. यात आणखी एक महत्वाची बाब सांगायची झाल्यास आपण तालिबानचा तो आतंक पाहून शांतही बसु शकत नाही. आणि दुसरीकडे आपण हिंदूत्ववाद्यांच्या आतंकवादाविषयी बोलतो. अशाप्रकारे विचार सध्या आपण करतो आहोत. या प्रतिक्रियेनं स्वरानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. त्यामुळे ती अनेकांच्या टीकेचाही विषय झाली आहे. एका युझरनं तातडीनं स्वरावर आयपीसीच्या २९५ अ या कलमान्वये गुन्हा दाखल करावा. अशी मागणी केली आहे. धार्मिक भावना भडकावल्याप्रकरणी स्वरावर सोशल मीडियातून टीकेची झोड उठली आहे.

स्वरानं तालिबानी आणि हिंदूत्ववाद्यांची तुलना केल्यानं तिच्यावर कारवाई करण्यात यावी. अशी मागणी आता सोशल मीडियातून करण्यात येत आहे. त्यामुळे स्वराच्या अडचणीत वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून जगाच्या पाठीवर एकाच गोष्टीची चर्चा आहे ती म्हणजे तालिबानी, त्यांनी बळकावलेला अफगाणिस्तान आणि त्यांचा दहशतवाद. त्यावरुन आतापर्यत बॉलीवूडच्या अनेक सेलिब्रेटींनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. मात्र यासगळ्यात वादग्रस्त प्रतिक्रिया स्वरानं दिल्याची चर्चा होती. त्यावरुन तिला ट्रोलही करण्यात आले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT