हे मा, माताजी... दया बेन चक्क मिनी स्कर्टमध्ये, व्हिडीओ व्हायरल

तारक मेहता का उल्टा चष्मा (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) ही मालिका मनोरंजन क्षेत्रातील सर्वात लोकप्रिय मालिका म्हणून ओळखली जाते.
 taarak mehta ka ooltah chashmah Anjali Bhabhi aka sunayana fozdar told truth about daya ben return
taarak mehta ka ooltah chashmah Anjali Bhabhi aka sunayana fozdar told truth about daya ben return

मुंबई - तारक मेहता का उल्टा चष्मा (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) ही मालिका मनोरंजन क्षेत्रातील सर्वात लोकप्रिय मालिका म्हणून ओळखली जाते. गेल्या काही दिवसांपासून या मालिकेतील वेगवेगळ्या भूमिका करणारे कलावंत हे चर्चेत आले आहे. त्याचे कारण म्हणजे त्यांची सतत वाढत जाणारी लोकप्रियता. आताही या मालिकेतील सर्वात महत्वाची भूमिका करणाऱ्या दया भाभी म्हणजे दिशा वकानी या चर्चेत आल्या आहेत. सध्या त्या मालिकेपासून लांब आहेत. त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. तो खरं तर त्यांनी फार पूर्वी केला होता. मात्र त्यात त्या मिनी स्कर्टमध्ये असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे दया बेन यांच्या त्या व्हिडिओची जोरदार चर्चा असल्याचेही दिसून आले आहे. दिशा वकानी (Disha Vakani) यांच्या मुलाखतीचाही एक व्हिडिओ काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता. त्यात त्यांनी आपले सहकारी जेठालाल यांच्याविषयी प्रतिक्रिया दिली होती.

तारक मेहता का उल्टा चष्मा ही सर्वात मालिका आहे. त्यातील अनेक पात्रं ही प्रेक्षकांच्या आवडीची आहेत. त्यातील जेठालाल आणि दया भाभी ही सर्वाधिक आवडीची पात्रं आहेत. त्यातील दिशा वकानीचा एक व्हिडिओ भलताच व्हायरल झाला आहे. त्या व्हिडिओमध्ये त्यांनी मिनी स्कर्ट घातला आहे. दया भाभी आणि मिनी स्कर्टमध्ये हे पाहूनच त्यांच्या काही चाहत्यांना आश्चर्याचा धक्काही बसला आहे. यापूर्वी दया भाभी यांना अशाप्रकारच्या लूकमध्ये पाहिलं नसल्याची भावना चाहत्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे दया भाभींचा हा लूक सोशल मीडियावरही ट्रेडिंगचा विषय आहे.

 taarak mehta ka ooltah chashmah Anjali Bhabhi aka sunayana fozdar told truth about daya ben return
Blog: एका तालिबानीचं नरेंद्र दाभोलकरांना पत्र...
 taarak mehta ka ooltah chashmah Anjali Bhabhi aka sunayana fozdar told truth about daya ben return
ती पुन्हा आली, शिल्पा शेट्टी पुन्हा 'सुपर डान्सच्या सेटवर'

दिशा वकानीचा (Disha Vakani) याअगोदर गरबा खेळतानाचाही व्हिडिओ व्हायरल झाला होता. नेहमीप्रमाणं त्यालाही चाहत्यांचा चांगला प्रतिसादही मिळाला. मात्र आताचा जो व्हिडिओ आहे तो खरं तर फार पूर्वीचा आहे. त्यावेळी दिशा वकानीनं बॉलीवूडमध्ये अभिनेत्री होण्याचं स्वप्न पाहिलं होतं. मात्र तिचं ते स्वप्न काही पूर्ण झालं नाही. जेव्हा तिला तारक मेहता का उल्टा चष्मामध्ये काम करण्याची संधी मिळाली तेव्हा मात्र दिशानं आपल्या नावाची वेगळी ओळख तयार केली. दिशा वकानी ही तिच्या तारक मेहताच्या मालिकेनं देशभरात ओळखली जाते. एखाद्या बॉलीवूड सेलिब्रेटीप्रमाणं तिचीही वेगळीच क्रेझ असल्याचे दिसून आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com