agnipankha
agnipankha 
मनोरंजन

अग्निपंख.. मराठी चित्रपट जगतात पहिल्यांदाच बनणार अग्निशमन दलावर चित्रपट

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : ‘अग्निपंख’ या सिनेमाचा टीजर पोस्टर नुकतेच फेसबुकवर लाॅंच करण्यात आले आहे. हॉलीवूडपट वाटावे असे हे पोस्टर मराठी चित्रपटसृष्टीत सध्या चर्चेचा विषय ठरले आहे. फायर ब्रिगेडवर आधारीत बीग बजेट सिनेमावर काम सुरू असल्याची चर्चा गेल्या वर्षभरापासून होती. आता हा पोस्टर पाहून या सिनेमाबद्दलची उत्सुकता आणखीनच वाढली आहे. ‘विटीदांडू’ या यशस्वी चित्रपटानंतर दिग्दर्शक गणेश कदम यांचा ‘अग्निपंख’ हा ड्रीमप्रोजेक्ट आहे.

महाकाय अग्नितांडव असो...भूकंप असो वा महाप्रलय, मनुष्यजीवासह प्राणी-पक्ष्यांचेही जीव वाचविण्याचे कार्य अग्निशमन दल प्रतिकूल परीस्थितीत करत असते. उन, वारा, पाऊस कशाचीही तमा न बाळगता अग्निशमन दलाच्या जवानांची असलेली निष्ठा वेळोवेळी अधोरेखित झाली आहे. अशा कर्तव्यनिष्ठ अगिनिशमन दलाचा संघर्ष एका जबरदस्त थरारक आणि रोमांचकारी घटनेतून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

अग्निपंख’ मराठी प्रेक्षकांसाठी व्हीज्युअल ट्रीट असणार आहे.” असा विश्वास दिग्दर्शक गणेश कदम यांनी व्यक्त केला. “अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि ग्राफिक्स मुळे चित्रपटाचं बजेट मोठं असलं तरी कसलीही कसर बाकी न ठेवता दृश्यानुभव उच्च प्रतीचा राखण्याचा आमचा प्रयत्न आहे. अग्निशमन दलाच्या सर्वात कठीण, श्वास रोखून ठेवणाऱ्या मोहिमेचा थरार प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे.” असे मत निर्माते रुतुजा बजाज आणि अनिल गायकवाड यांनी व्यक्त केले. या चित्रपटाचे कलाकारही लवकरच जाहीर होणार आहेत. 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Archery World Cup : तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत भारतीयांचा डंका! पुरुष आणि महिला कंपाऊंड संघांनी पटकावली सुवर्णपदके

Latest Marathi News Live Update: तामिळनाडूमध्ये बसचा अपघात; १५ जखमी

Tesla Layoffs: इलॉन मस्कच्या कंपनीत चाललंय काय? आणखी काही कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता

Baba Ramdev: पतंजली समूह नवीन कंपनी खरेदी करण्याच्या तयारीत; काय आहे बाबा रामदेव यांचा प्लॅन?

Raw Mango: उन्हाळ्यात कैरीचा थंडगार कचुंदा घरीच नक्की करा ट्राय, जाणून घ्या रेसिपी

SCROLL FOR NEXT