Aamir Khan-Aishwarya kissing Scene Esakal
मनोरंजन

Aamir Khan-Aishwarya: 'राजा हिंदुस्तानी'मध्ये होणार होता ऐश्वर्या- आमिरचा किस ! 'या' कारणामुळे ऐश्वर्याने दिला नकार

सकाळ डिजिटल टीम

Raja Hindustani Movie: आज जरी बॉलिवूड चित्रपटांची जादु बॉक्स ऑफिसवर चालत नसली तरी नव्वदच्या दशक बॉलिवूडच्या काही ठराविक चित्रपटांसाठी चांगलाच गाजला. अनेक कलाकारांच्या जोडीने प्रेक्षकांच मनोरंजन केलं.

ज्या आजही प्रेक्षकांच्या मनात स्थान करुन आहेत .मग ती शाहरुख- काजोल असो किंवा अजय आणि तब्बू किंवा अजय आणि रविना..यातच आमिरही मागे नव्हता. तो त्याच्या अभिनयाने आणि देखण्या रुपाने चाहत्यांना भुरळ घालत होता.

त्याने अनेक अभिनेत्रींसोबत काम केले आहे. मात्र आमिर खान आणि ऐश्वर्या राय यांची जोडी अजूनही एकत्र चित्रपटात दिसलेली नाही. चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकार आहेत त्याच्या चाहत्यांची संख्याही चांगलिच आहे. मात्र ऐश्वर्या आणि आमिरने अद्याप कोणत्याही चित्रपटात स्क्रीन शेअर केलेली नाही.

या हिट जोडीला एकत्र पाहण्यासाठी दोन्ही स्टार्सचे लाखो चाहते उत्सुक आहेत. मात्र आमिर खान आणि ऐश्वर्या राय यांना सोबत एकाच चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली होती. मात्र त्यांची जोडी बनता बनता राहिली. त्यांनी एका अतिशय रोमँटिक चित्रपटात एकत्र काम करणे मिस केले असले तरी. ऐश्वर्या आणि आमिरने अद्याप कोणत्याही चित्रपटात स्क्रीन शेअर केलेली नाही.

Aamir Khan

त्याच झालं असं की आमिरचा सुपरहिट चित्रपट 'राजा हिंदुस्तानी' 1996 मध्ये रिलिज झाला. या चित्रपटाने बॉक्स आफिसवर धुमाकूळ घातला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिलं. अजूनही त्याच्या या चित्रपटाची गाणी चर्चेत असतात.

याचित्रपटातील आमिर खान आणि करिश्मा कपूरची जोडीही खूप आवडली होती. मात्र, चित्रपटाचे दिग्दर्शक धर्मेश दर्शन यांना 'आरती'च्या भूमिकेसाठी करिश्मा कपूर ही पहिली आवड नव्हती. त्यांना या चित्रपटात आधी ऐश्वर्या रायला कास्ट करायचे होते.

मात्र ऐश्वर्या रायला चित्रपटाला नकार द्यावा लागला. कारण जेव्हा ऐश्वर्या रायला 'राजा हिंदुस्तानी'ची ऑफर आली होती, त्यावेळी तिला मिस वर्ल्ड स्पर्धेत भाग घ्यावा लागला होता. यामुळे अभिनेत्रीने चित्रपटात काम करण्यास नकार दिल्याने आमिर खानसोबत तिची जोडी होऊ शकली नाही.

यानंतर दिग्दर्शकाने ती भूमिका करिश्मा कपूरला दिली. करिश्मा कपूरने आपल्या उत्कृष्ट अभिनयाने आणि सौंदर्याने प्रेक्षकांना वेड लावलं आणि या चित्रपटाने वेगळीच ओळख निर्माण केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ward Structure: पुणे महापालिकेची अंतिम प्रभाग रचना जाहीर; राजकीय सोय बघून प्रभागांमध्ये बदल?

Uddhav Thackeray : संघटनात्मक बांधणी भक्कम केल्याशिवाय ते जिंकले कसे, आपण हरलो कसे याची उत्तरे मिळणार नाहीत : उद्धव ठाकरे

Tata Capital IPO: 'टाटा'च्या आयपीओचा धमाका! सामान्यांसाठी खुला होण्यापूर्वीच बड्या कंपन्यांची मोठी गुंतवणूक

Ambad News : अंबड तालुक्यातील लालवाडी तांडा नंबर 1 वर घडली दुर्दैवी घटना; तलावात पाय घसरून अकरा वर्षीय राजवीर राठोड याचा बुडून मृत्यू

Latest Marathi News Live Update: शेतकऱ्यांच्या मदतीसाठी काँग्रेस आक्रमक, तहसीलदारांसोबत बाचाबाची

SCROLL FOR NEXT