Dasara Box Office Collection Day 1
Dasara Box Office Collection Day 1 Esakal
मनोरंजन

Box Office Collection: साउथच्या 'दसरा' पुढे अजयचा 'भोला' टिकेना! काय सांगतायत बॉक्स ऑफिसचे आकडे...

Vaishali Patil

बॉलीवूड सुपरस्टार अजय देवगण आणि तब्बू यांचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'भोला' याची रिलिजपुर्वी बराच चर्चेत होता. रामनवमीच्या मुहूर्तावर भोला बॉक्स ऑफिसवर रिलीज झाला आहे. मात्र अजयला या चित्रपटाकडून जितकी अपेक्षा होती तसं काही चित्र बॉक्स ऑफिसवर पहायला मिळत नाही आहे.

पहिल्याच दिवशी चित्रपटाचंकलेक्शन खूपच कमी होतं. आश्चर्याची गोष्ट म्हणजे अजय देवगणच्या आतापर्यंत प्रदर्शित झालेल्या चित्रपटांमध्ये हा चित्रपट सर्वात कमी ओपनर ठरला आहे.

बॉलीवूड सुपरस्टार अजय देवगणचा भोला चित्रपटासोबत साऊथ अभिनेता नानीचा दसरा हा चित्रपट देखील रिलिज झाला आहे.

बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवसापासूनच दोन्ही चित्रपटांमध्ये कमाईची लढाई सुरू आहे. पहिल्या दिवशी दसरा या चित्रपटाने अजयच्या भोला ला मागे टाकले होते.

आता 'भोला' आणि 'दसरा'च्या दुसऱ्या दिवसाचे आकडेही समोर आले आहेत.

अजय देवगण आणि तब्बूच्या 'भोला' चित्रपटाचे कलेक्शन शुक्रवारी वाढण्याऐवजी दुसऱ्या दिवशीही काही खास नाही.

गुरुवारी या चित्रपटाने 10 कोटी रुपयांची कमाई केली होती. पण आता शुक्रवारी चित्रपटाच्या कमाईत 35% नी घसरली आहे. शुक्रवारी 'भोला'ने केवळ 6.50 कोटी रुपयांचे कलेक्शन केले आहे.

तर दुसरीकडे नानीच्या 'दसरा' चित्रपटाच्या एकूण कमाईबद्दल बोलायचे झाल्यास, नानीच्या 'दसरा'ने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर 23 कोटींचा व्यवसाय केला.

तर दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 12 कोटीची कमाई केली आहे. त्याचवेळी, आता दुसऱ्या दिवसाच्या कमाईत भर पडल्याने चित्रपटाचे एकूण कलेक्शन 35 कोटी रुपये झाले आहे.

शुक्रवारी दोन्ही चित्रपटांच्या कलेक्शनमध्ये घसरण झाली असली तरी भोलावर अजूनही दसरा या चित्रपाटाच्या मागेच आहे.

पहिल्या दिवशीही नानीच्या चित्रपटाने अजय देवगणच्या चित्रपटाला तगडी टक्कर दिली आणि दुसऱ्या दिवशीही तेच होताना दिसत आहे.

त्यामुळे नक्कीच टॉलिवूडच्या दसरा या चित्रपटाने बॉलिवूडला पुन्हा मागे टाकलं असल्याचं दिसतयं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs CSK Live Score: रचिन रविंद्रचे शानदार अर्धशतक! चेन्नईच्या आशाही फुलवल्या

Lok Sabha Election 2024: निवडणुकीदरम्यान 8,889 कोटींची रोकड, 4,000 कोटींचं ड्रग्ज जप्त! निवडणूक आयोगाची माहिती

Lok Sabha Election 2024 : रायबरेली, अमेठीत प्रचाराचा धडाका! राहुल गांधी विरुद्ध ‘स्थानिक’ असा तडका

Video: अत्यंत संतापजनक! भर बाजारात अल्पवयीन मुलीसोबत अश्लील वर्तन; व्हिडिओ पाहून तुम्हालाही येईल राग!

RCB vs CSK: सँटेनरनं बॉलला स्पर्श केला अन् डू प्लेसिस रनआऊट झाला, पण विकेट अडकली वादाच्या भोवऱ्यात

SCROLL FOR NEXT