akshay srk 
मनोरंजन

अक्षय कुमार देणार शाहरुखच्या 'पठाण' सिनेमाला टक्कर

दिपाली राणे-म्हात्रे

मुंबई- अक्षय कुमार बॉलीवूडच्या त्या अभिनेत्यांपैका एक आहे जो त्याच्या अनेक सिनेमांमधून सामाजिक संदेश देत असतो. वर्षभरात जास्त  सिनेमे करण्यामध्ये अक्षय कुमारचा नंबर पहिला लागतो. अक्षय आत्तापर्यंत ऍक्शन सिनेमापासून ते कॉमेडी सिनेमापर्यंत वेगवेगळ्या जॉनरमधून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. आता तर अक्षय कुमार त्याच्या आगामी सिनेमामधून शाहरुख खानच्या आगामी 'पठाण' या सिनेमाला टक्कर देणार आहे. 

बॉलीवूडचा किंग खान शाहरुख झिरो या सिनेमानंतर दोन वर्षांच्या मोठ्या गॅपने पठान या त्याच्या आगामी सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात शाहरुख खान डबर रोल साकारणार असल्याचं कळतंय. तर दुसरीकडे अक्षय कुमारने देखील त्याच्या आगामी सिनेमात डबल रोल साकारण्याची तयारी सुरु केली आहे. अक्षय कुमारचा हा सिनेमा साय-फाय म्हणजेच सायंश फिक्शन सिनेमा असेल. या सिनेमात स्पेशल इफेक्ट्स आणि वीएफएक्सचा वापर केला जाईल. 

अक्षय कुमारने त्याच्या या आगामी सिनेमासाठी पुन्हा एकदा जगन शक्तीसोबत हातमिळवणी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या सिनेमात स्पेशल इफेक्ट्स आणि वीएफएक्सचा चांगल्या प्रकारे वापर करण्यात येणार आहे. दिग्दर्शक जगन शक्तीसोबत अक्षय कुमारचा हा दुसरा सिनेमा आहे. याआधी त्याने 'मिशन मंगल' या सिनेमात त्यांच्यासोबत काम केलं होतं. या सिनेमाचं शिर्षक अजुन समोर आलेलं नाही. 

या सिनेमाच्या बाबतीत सांगायचं झालं तर हा एक बिग बजेट सिनेमा असेल. सिनेमाचं शूटींग आणि इतर कलाकारांबाबतची माहिती अजुन समोर आलेली नाही. केवळ कथा, दिग्दर्शक आणि अक्षय कुमार तयार आहेत. असं म्हटलं जात आहे की सिनेमाचं शूटींग पुढच्या वर्षी २०२१ च्या शेवटाला सुरु होईल. सायंस फिक्शन हा एक असा जॉनर आहे ज्यामध्ये आत्तापर्यंत अक्षय कुमारचा एकही सिनेमा हिट होऊ शकलेला नाही. तेव्हा या सिनेमाची चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे.   

akshay kumar play double role in next with jagan shakti science fiction movie  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik News : राज्यातील १५ हजार तलाठ्यांचा 'एल्गार'! कालबाह्य लॅपटॉप प्रशासनाकडे जमा, ऑनलाइन कामं ठप्प

Chandrapur : कर्ज फेडण्यासाठी किडनी विकली, कुठे आणि कशी तेही सावकारानं सांगितलं; शेतकऱ्याच्या आरोपाने खळबळ

Latest Marathi News Live Update : रुपयाची ऐतिहासिक घसरण, डॉलरच्या तुलनेत 91 रुपयांवर

तब्बल ७ वर्षांनी छोट्या पडद्यावर परत आली लोकप्रिय अभिनेत्री; स्टार प्रवाहच्या नव्या मालिकेत दिसली, प्रेक्षकांनी पाहताच ओळखली

Kolhapur : लोकसभा- विधानसभेपुरतेच अजित पवार हवे होते; आता महायुतीत गरज संपली – सतेज पाटीलांचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT