Akshay Kumar Ram Setu Teaser
Akshay Kumar Ram Setu Teaser Akshay Kumar Ram Setu Teaser
मनोरंजन

Akshay Kumar : दिवाळीत प्रदर्शित होणार राम सेतू; नवरात्रीच्या पहिल्या दिवशी टीझर रिलीज

सकाळ डिजिटल टीम

Akshay Kumar Ram Setu Teaser अक्षय कुमारचा (Akshay Kumar) आगामी चित्रपट राम सेतूची मोठी उत्सुकता आहे. नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी चित्रपट कधी प्रदर्शित होणार हे जाहीर करण्यात आले. हा चित्रपट दिवाळीत २५ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचा सोमवारी टीझर पाहायला मिळाला. चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर याबाबतची माहिती दिली आहे.

चित्रपटगृहात प्रदर्शित झाल्यानंतर चित्रपट ॲमेझॉन प्राईमवर बघायला मिळेल. चित्रपटात अक्षय कुमार व्यतिरिक्त जॅकलीन फर्नांडिस आणि नुसरत भरूचा प्रमुख भूमिकेत आहेत. टीझर व्हिडिओमध्ये अक्षय (Akshay Kumar) ॲक्शन अवतारात खास मिशनवर दिसत आहे. हे मिशन म्हणजे राम सेतू वाचवण्याचे आहे. ज्यासाठी त्याच्याकडे फक्त ३ दिवस आहेत.

चित्रपटाची कथा भारतीय पौराणिक कथांवर आधारित असल्याचे टीझरवरून स्पष्ट झाले आहे. भारतीय संस्कृतीतील महत्त्वाची पौराणिक कथा रामायणात वर्णन केलेल्या राम सेतू भोवती फिरते. अक्षय हा पुरातत्वशास्त्रज्ञाच्या भूमिकेत भारतीय संस्कृतीचा हा वारसा जतन करण्याच्या मोहिमेत गुंतलेला दाखवण्यात आला आहे. मिशनमध्ये त्याला अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस साथ देत आहे.

अक्षयला हे मिशन तीन दिवसांत पूर्ण करायचे आहे, असे टीझरमध्ये दाखवण्यात आले आहे. पौराणिक साहसी ॲक्शन चित्रपटात अक्षय स्वत: कोणत्याही लढाऊ लूकमध्ये दिसत नाही. यावेळी तो इंटेन्स लूकमध्ये ॲक्शनचा भाग बनला आहे. टीझरच्या एका भागात पाण्याखाली ‘जय सिया राम’ या घोषणेचा प्रतिध्वनी कथेला सस्पेन्ससारखा ट्विस्ट देते.

राम सेतू काय?

राम सेतू भारताच्या आग्नेय किनाऱ्यावरील रामेश्वरम बेट आणि श्रीलंकेच्या वायव्य किनाऱ्यावरील मन्नार बेट यांच्यामधला एक रस्ता आहे. जो सीतेला रावणापासून मुक्त करण्यासाठी भगवान राम आणि वानर सैन्याने बांधला होता. भौगोलिक पुराव्यावरून असे दिसून येते की कधीकाळी हा पूल भारत आणि श्रीलंका यांना जमिनीच्या मार्गाने जोडत असे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Elections: मविआचा फॉर्म्युला ठरला?, कुणाला मिळणार किती जागा, जागावाटपाबाबत निकष काय?

Rohit Pawar: "अधिवेशन होऊ दे...फंड मिळू दे…आम्ही विचार करु", कोणाला पक्षात घ्यायचं याबद्दल रोहित पवार स्पष्टच बोलले

Latest Marathi Live Updates : दार्जिलिंग रेल्वे अपघातात 8 जणांचा मृत्यू, 50 जण जखमी; बचावकार्य पूर्ण

Goa Monsoon Trip: सोनेरी वाळू अन् रूपेरी लाटा.... 'या' 5 कारणांमुळे पावसाळ्यात गोवा ट्रिप बनवू शकता खास

IND vs AFG : सुपर-8च्या पहिल्या सामन्यात टीम इंडियाच्या कॉम्बिनेशनमध्ये मोठा बदल... 'या' स्टार खेळाडूची होणार एंट्री?

SCROLL FOR NEXT