Akshay Kumar sooryavanshi Movie release on 24th March 
मनोरंजन

''आता गुन्हेगारीला थारा नाही..आ रहे है पोलिस''

सकाळवृत्तसेवा

पुणे : अक्षय कुमारच्या 'सुर्यवंशी' हा पोलिसांवर आधारित चित्रपटाची रिलिज डेट फायनल झाली आहे. आधी हा चित्रपट 27 मार्चला रिलिज होणार अशी चर्चा सुरु होती. मात्र, आता तीन दिवस आधी म्हणजे 24 मार्चला होणार आहे. विशेष म्हणजे  'सुर्यवंशी' हा बॉलिवूडमधील पहिला चित्रपट आहे जो रिलिज झाल्यानंतर मुंबईमध्ये 24/7 पाहता येणार आहे.  

अक्षय कुमारने  ट्विटरवर व्हिडिओ शेअर करुन या रिलिज डेटवर शिक्तामोर्तोब केला आहे. ''आता गुन्हेगारीला थारा नाही..आ रही है पोलिस'' असे कॅप्शन दिले आहे. या व्हिडिओमध्ये अक्षय कुमार, रणवीर सिंह आणि अजय देवगण, कॅटरिना कैफ दिसत आहेत. हा व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर काही वेळातच व्हायरल झाला आहे. #SooryavanshiOn24thMarch असा हॅशटॅग ट्विटरवर ट्रेंड होत आहे. 

'सिंबा'च्या ब्लॉकबस्टर यशानंतर दिग्दर्शक रोहित शेट्टी पुन्हा एकदा थ्रिलींग आणि अॅक्शनपट 'सुर्यवंशी' घेऊन येत आहे. पोलिसांवर आधारित 'सूर्यवंशी' हा चित्रपटानिमित्त रोहित शेट्टी आणि खिलाडी अक्षय कुमार एकत्र येत आहेत. यामध्ये अजय आणि रणवीर सिंह कॅमिओ रोलमध्ये दिसणार आहे. सिंबामध्ये अक्षय कॅमिओ रोलमध्ये दिसला होता. त्यातच त्याने 'सूर्यवंशी'ची झलक दिली होती.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR Live : मुंबई इंडियन्सने १४ वर्षांचा 'शाप' संपवला! IPL मधील सर्वात मोठा विजय मिळवला; रोहित, रिकल्टनची मॅच विनिंग खेळी

कोल्हापूरची अमृता पुजारी महिला महाराष्ट्र केसरी; वेदिकाला अस्मान दाखवत जिंकली चांदीची गदा अन् कार

अपहरणकर्त्यांचा कॉल ‘तुमचा मुलगा आमच्या ताब्यात, ५० लाख द्या, पोलिसांत गेल्यास मुलाला ठार मारु’; सोलापूर पोलिसांच्या ‘एलसीबी’ची १४ तासांची मेहनत अन्‌...

MI vs KKR Live: रोहित शर्माची IPL इतिहासातील वेगवान फिफ्टी! ११ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला, 'फॅब फोअर'च्या पंक्तित बसला

Land Survey: भूमापन प्रक्रिया होणार वेगवान! फडणवीस सरकारने घेतला मोठा निर्णय; जमीन मोजणीसाठी नवी योजना लागू

SCROLL FOR NEXT