bell bottom movie  team esakal
मनोरंजन

'बेल बॉटम'मधलं पहिलं गाणं व्हायरल, खिलाडीवर कौतुकाचा वर्षाव

अक्षय कुमार akshay kumar याचा बहुप्रतिक्षित असा बेल बॉटम bell bottom हा चित्रपट प्रदर्शनच्या उंबरठ्यावर आहे.

युगंधर ताजणे

मुंबई - अक्षय कुमार akshay kumar याचा बहुप्रतिक्षित असा बेल बॉटम bell bottom हा चित्रपट प्रदर्शनच्या उंबरठ्यावर आहे. गेल्या काही दिवसांपासून त्याची सोशल मीडियावर social media चर्चा आहे. 19 ऑगस्टला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्याच्या जोडीला फास्ट अँड फ्युरियस fast and furious नावाचा चित्रपटही प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे नेमकं कुणाच्या वाट्याला अधिक यश येणार असा प्रश्न चाहत्यांसोबतच निर्मात्यांनाही पडला आहे. गेल्या काही दिवसांपासून अक्षयच्या बेल बॉटमची चर्चा सुरु आहे. आणि आता तो प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटातील एक गाणं प्रदर्शित झालं आहे.

अक्षय या चित्रपटामध्ये एका एजंटाची भूमिका बजावताना दिसणार आहे. त्यात त्याच्या जोडीला वीणा कपूरही दिसणार आहे. या चित्रपटामध्ये वाणी त्याच्या पत्नीच्या भूमिकेत आहे. याशिवाय लारा दत्ता, आणि हुमा कुरेशीही त्यात महत्वाच्या भूमिकेत आहे. मरजावा नावाचं गाण सध्या सोशल मीडियावर प्रदर्शित झालं आहे. त्याला चाहत्यांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला आहे. आतापर्यत त्याला लाखो व्ह्युजही मिळाले आहेत. या गाण्याला गुरनजर आणि असीस कौर यांनी आवाज दिला आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर थिएटरमध्ये प्रदर्शित होणारा पहिला चित्रपट म्हणजे बेल बॉटम आहे. त्याचा ट्रेलर हा दिल्लीतील सिंगल स्क्रिन थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. त्यालाही प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळाला. बेल बॉटमच्या निर्मात्यांनी अशी अपेक्षा आहे की, ते सिंगल स्क्रिनवर हा चित्रपट पाहण्यास नक्की येतील. बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमार (akshay kumar) आणि हॉलीवूडमधील फास्ट अँड फ्युरियस (fast and furious 9) हे दोन्ही चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित होणार आहे. प्रेक्षकांना ही आगळी वेगळी पर्वणी असली तरी निर्मात्यांना मोठी चिंता आहे की, बॉक्स ऑफिसवर कोण बाजी मारणार? गेल्या काही महिन्यांपासून कोरोनानं मनोरंजन क्षेत्राचं मोठं नुकसान झालं आहे.

त्यामुळे कित्येक निर्मात्यांनी आपले चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्याचे ठरवले. आणि तो निर्णय अंमलातही आणला. सलमान खानचा बिग बजेट राधे द मोस्ट वाँटेड भाई हा चित्रपटही ओटीटीवर प्रदर्शित झाला होता. त्याला थोड्याफार प्रमाणात यश मिळाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tahawwur Rana : 26/11 दहशतवादी हल्ला प्रकरणी महत्त्वाची अपडेट; तहव्वूर राणानं दिली हल्ल्याची कबुली, नेमकं काय केला खुलासा?

Accident News: देव तारी त्याला...! पाच मजली इमारत कोसळूनही तीन महिन्यांची चिमकुली सुखरुप बचावली, 27 जणांचा मृत्यू

Latest Maharashtra News Updates : लोकांच्या घरी होळ्या पेटवून पोळ्या भाजण्याचा भाजपाचा धंदा - उद्धव ठाकरे

Mutual Fund: 3,000 रुपयांची SIP की 3 लाख रुपयांची Lumpsum: 30 वर्षांनंतर कोण देणार जास्त परतावा?

Nagpur Crime: नागपूर हादरलं! प्रियकराच्‍या मदतीने पतीचा खून; उत्तरीय चाचणीच्या अहवालातून खुलासा

SCROLL FOR NEXT