Akshaya-Hardeek Wedding, Akshaya Post on her wedding venue in pune. Esakal
मनोरंजन

Akshaya Deodhar: 'लग्न पुण्यात करायचं जेव्हा ठरलं तेव्हा....', अक्षयानं सांगितला मनात आलेला पहिला विचार

अक्षया आणि हार्दिक यांच्या पुण्यातील लग्नाच्या वेन्यूविषयी एक मोठा खुलासा स्वतः अभिनेत्रीनं केला आहे.

प्रणाली मोरे

Akshaya Deodhar: हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर यांनी आपल्या अनेक वर्षाच्या नात्याला अखेर लग्नबंधनात बांधलं अन् त्यांच्या अनेक चाहत्यांना सुखानुभव दिला. २ डिसेंबर,२०२२ रोजी हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर यांनी पुण्यात आप्तेष्ट आणि मित्र-परिवाराच्या उपस्थितीत लग्नगाठ बांधली. दोघांनीही अगदी रितसर विधी-परंपरांचा सोहळा साजरा करत दणक्यात लग्न केलं ते देखील आपल्या पुण्यात.. आता लग्नानंतर अक्षयानं आपल्या वेडिंग वेन्यू संदर्भात एक पोस्ट शेअर केली आहे,जिची चर्चा होताना दिसत आहे.(Akshaya-Hardeek Wedding, Akshaya Post on her wedding venue in pune)

अक्षया मुळची पुण्याची पण हार्दिक पुण्याचा नसल्यानं एकमत होणं महत्त्वाचं होतं. त्यासाठी पुण्यात लग्न समारंभ आणि त्यासंबंधित सोहळे ज्याठिकाणी पार पडणार ते ठिकाण सगळ्यांना आवडणं देखील तितकंच महत्त्वाचं होतं असं अक्षयानं आपल्या एका पोस्टमधून नुकतंच खुलासा करत सांगितलं आहे. तेव्हा पुण्यात लग्न करायचं असं जेव्हा एकमत झालं तेव्हा मनात पहिला कोणता विचार आला आणि त्याप्रमाणं नंतर लग्नाच्या वेन्यूविषयी सगळं कसं ठरत गेलं यावर देखील अक्षयानं काही गोष्टींचा खुलासा केला आहे.

हेही वाचा: First Paralympic Winner : मुरलीकांत पेटकर सांगतायत अपंग खेळाडूंसमोरील आव्हाने

अक्षया देवधरनं आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे ,''लग्न पुण्यात करायचं जेव्हा ठरलं तेव्हा पहिला विचार हा आला की आम्हा दोघांच्याही इतक्या मोठ्या families मावतील असच ठिकाण हवं. मग थोडं indoor पण हवं आणि थोडं outdoor पण हवं, आणि मग धावपळ सुरु झाली! काही ठिकाणं पाहिली पण आवडली नाही. मग आमचा Wedding Planner @bhagatamol ने @siddhigardensandbanquets चं नाव सुचवलं. आणि अगदी हवं तसं ठिकाण आम्हाला सापडलं..! Banquets & Gardens सोबतच उत्तम rooms ही असल्याने काहीही अडथळा न येता आम्ही दोन दिवस आमच्या family व friends सोबत धम्माल केली. So Thank You So Much @multispiceveg for excellent food & @siddhigardensandbanquets for Superb Venue & Service....''

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! पंतप्रधान मोदी मे महिन्यात येणार सोलापुरात; विद्यापीठाने पाठविले पंतप्रधानांच्या सचिवांना पत्र; आता कोंडीपासून होणार थेट रस्ता, वाचा...

IND vs SA: भारतीय संघाचा पराभव, पण बुमराह-अर्शदीपचे मोठे विक्रम; T20 World Cup इतिहासात ठरले सरस भारतीय गोलंदाज

Amravati Accident : भीषण अपघात ! चालकाचे नियंत्रण सुटल्याने पिकअप वाहन ७० फूट दरीत कोसळले, चार जण जागीच ठार

मोठी बातमी! अधिवेशनातच होणार शेतकरी कर्जमाफीची घोषणा; थकबाकीमुळे २५ लाख शेतकऱ्यांसाठी बॅंकांचे दरवाजे बंद, कशी असणार कर्जमाफी, वाचा...

T20 WC, IND vs SA: 'पॉवरप्लेमध्ये सामना जिंकू शकत नाही, पण...', सूर्यकुमारने द. आफ्रिकेविरुद्धच्या पराभवाचे काय सांगितले कारण?

SCROLL FOR NEXT