Alia Bhatt Birthday celebration  esakal
मनोरंजन

Alia Bhatt Birthday: ताज हॉटेलमध्ये पार पडली आलियाची ग्रँड बर्थ-डे पार्टी; ईशा आणि आकाश अंबानीसह अनेक सेलिब्रिटींनी लावली हजेरी

Alia Bhatt Birthday celebration: मुंबईतील ताज हॉटेलमध्ये आलियाची बर्थ-डे पार पडली. या पार्टीला अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली.

priyanka kulkarni

Alia Bhatt Birthday celebration: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भट्टचा (Alia Bhatt) आज 31 वा वाढदिवस आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून आलियाचे चाहते तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. काल (14 मार्च) रात्री आलियाच्या वाढदिवसाच्या ग्रँड पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. मुंबईतील ताज हॉटेलमध्ये आलियाची बर्थ-डे पार पडली. या पार्टीला अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली.

आलियाच्या बर्थ-डेला 'या' कलाकारांनी लावली हजेरी

आलियाचा पती रणबीर कपूर, आई सोनी राजदान, बहीण शाहीन भट्ट आणि सासू नीतू कपूर यांनी आलियाच्या बर्थ-डेला हजेरी लावली. तसेच ईशा अंबानी, आकाश अंबानी आणि श्लोका मेहता हे देखील या बर्थ-डे सेलिब्रेशनमध्ये हजर होते.

आलियाचा खास लूक

बर्थ-डे पार्टीमधील आलियाचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. यामध्ये आलिया ही ब्लू डेनिम जीन्स आणि गोल्डन कलरचा ग्लिटरी टॉप अशा लूकमध्ये दिसली.

रणबीरच्या टी-शर्टनं वेधलं लक्ष

रणबीरने आलियाच्या बर्थ-डे पार्टीसाठी खास लूक केला होता. त्यानं काळ्या रंगाचा टी-शर्ट परिधान केला होता. ज्यावर 'राहा' असे लिहिले होते. राहा हे आलिया आणि रणबीरच्या मुलीचं नाव आहे. रणबीरने कस्टमाइज टी-शर्ट घातला आहे ज्यावर राहा पांढऱ्या रंगात लिहिलेले दिसले.

आलिया आणि ईशा यांची मैत्री

आलिया आणि ईशा या दोघी मैत्रिणी आहेत. तसेच रणबीर कपूर आणि आकाश अंबानी हे देखील चांगले मित्र आहे. अनंत अंबानींच्या प्री-वेडिंग फंक्शनला देखील आलिया आणि रणबीर यांनी हजेरी लावली.

आलियाचे चित्रपट

हायवे, गंगूबाई काठियावाडी, राझी, डियर जिंदगी, आरआरआर, ब्रह्मास्त्र, रॉकी और रानी की प्रेम कहानी, गली बॉय या चित्रपटात आलियानं काम केलं. गंगूबाई काठियावाडी या चित्रपटातील भूमिकेसाठी आलियाला राष्ट्रीय पुरस्कारानं गौरवण्यात आलं. आता आलिया ही तिच्या 'जिगरा' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आलियाच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs AUSW Live: भारतीय संघाचे T20 World Cup मधून पॅकअप! ऑस्ट्रेलियाचा दणदणीत विजय अन् दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीत... हरमनप्रीत कौरच्या संघाला अपयश

IND vs IRE 2nd T20I : आयर्लंडने इतिहास रचला! भारतीय संघाला ट्वेंटी-२० मालिकेत नमवले, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाची लाजीरवाणी सुरुवात

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर वाढला मृत्यूचा धोका! टोल टाळण्यासाठी 'नो-एंट्री'तून वाहनांची सर्रास एंट्री; नियमांना हरताळ

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Vidarbha Rain Alert : विदर्भासाठी दिलासादायक बातमी! पावसाचा जोर वाढणार, ११ जिल्हे यलो अलर्टवर

SCROLL FOR NEXT