Alia Bhatt Birthday esakal
मनोरंजन

Alia Bhatt Birthday: बॉलिवूड गाजवणारी आलिया आहे कोट्यवधींची मालकीण; एका सिनेमाचं किती घेते मानधन? आकडा वाचून डोळे विस्फारतील

आलिया ही एका सिनेमात काम करण्यासाठी किती माधनधन घेते? हे जाणून घेऊयात..

priyanka kulkarni

Alia Bhatt Birthday: अभिनेत्री आलिया भट्टनं (Alia Bhatt) तिच्या टॅलेंटच्या जोरावर बॉलिवूडमध्ये विशेष स्थान निर्माण केलं. आलियाचा आज 31 वा वाढदिवस आहे. आलियानं काल मध्यरात्री कुटुंबासोबत वाढदिवस साजरा केला. तिच्या वाढदिवसाला काही सेलिब्रिटींनी देखील हजेरी लावली. आलिया ही तिच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते. गेल्या काही दिवसांपासून आलिया ही सामाजिक विषयांवर आधारित चित्रपटांद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आलिच्या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. अशताच आलिया ही एका सिनेमात काम करण्यासाठी किती माधनधन घेते? हे जाणून घेऊयात..

आलिया आहे कोट्यवधींची मालकीण

मीडिया रिपोर्ट्सनुसार, आलिया भट्टची एकूण संपत्ती 550 कोटींपेक्षा जास्त आहे. इंडस्ट्रीतील यशस्वी कलाकारांपैकी एक असणारी आलिया एका चित्रपटासाठी सुमारे ₹10-12 कोटी रुपये मानधन घेते. तसेच आलिया ही चित्रपटांसोबतच जाहिरातींमध्ये देखील काम करते. एका जाहिरातीत काम करण्यासाठी ती 1-2 कोटी मानधन घेते.

आलिया आहे बिझनेसवुमन

आलियाची Ed-a-Mamma नावाची कंपनी आहे. ज्यामध्ये लहान मुलांचे आणि त्यांच्या आईचे आऊटफिट्स मिळतात. रिपोर्टनुसार, कंपनीची किंमत आता 150 कोटींहून अधिक आहे. तसेच आलियानं इटर्नल सनशाईन प्रॉडक्शन या नाव्याच्या प्रॉडक्शन हाऊसची सुरुवात 2021 मध्ये केली.

आलिया आणि रणबीरची लव्ह स्टोरी

आलिया आणि रणबीरच्या लव्ह स्टोरीला 'ब्रह्मास्त्र' या चित्रपटाच्या सेटपासून सुरूवात झाली. दोघांनी एप्रिल 2022 मध्ये लग्न केले. आलिया आणि रणबीर यांना नोव्हेंबर 2022 मध्ये मुलगी झाली. या मुलीचं नाव त्यांनी 'राहा' असं ठेवले.

आलियाचे चित्रपट

आलियानं 2012 मध्ये रिलीज झालेल्या करण जोहरच्या स्टुडंट ऑफ द इयर चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. हायवे, गंगूबाई काठियावाडी, राझी, डियर जिंदगी, आरआरआर, ब्रह्मास्त्र, रॉकी और रानी की प्रेम कहानी, गली बॉय, या चित्रपटातील तिच्या भूमिकेचे कौतुक झाले. गंगूबाई काठियावाडीतील भूमिकेसाठी तिला राष्ट्रीय पुरस्कारानं गौरवण्यात आलं. आता आलियाच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: निळा मफलर.. डोळ्यांवर गॉगल! राज ठाकरेंच्या 'लूक'मध्ये राजकीय संदेश? अमित ठाकरेही निळ्या शर्टवर

Latest Maharashtra News Updates : सन्माननीय उद्धव ठाकरे...म्हणत राज ठाकरेंची भाषणाला सुरुवात...

Raj Thackeray: जे बाळासाहेब ठाकरेंना जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं, राज ठाकरेंकडून भाषणाच्या सुरुवातीलाच मुख्यमंत्र्यांवर टीका

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Video : "वारी चुकली, पण विठ्ठल भेटला" हॉस्पिटलमध्ये घडली हृदयस्पर्शी घटना; व्हायरल व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील..

SCROLL FOR NEXT