aaliya on deepika and priyanka
aaliya on deepika and priyanka 
मनोरंजन

आलिया भट्टने स्टेजवर अशी केलेली दीपिका आणि प्रियांकाची नक्कल, रणवीर सिंह हसून लोटपोट

दिपालीराणे-म्हात्रे, टीम ई सकाळ

मुंबई- बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्ट तिच्या चुलबुल्या अंदाजासाठी आणि तिच्या कामासाठी ओळखली जाते. सध्या आलिया कोरोनाच्या या संकटकाळात जरी घरीचं असली तरी सोशल मिडियावर ती ऍक्टीव्ह आहे. तिच्या चाहत्यांसाठी ती अपडेट्स शेअर करत असते. नुकताच आलिया भट्टचा एक जुना व्हिडिओ व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये ती दीपिका आणि प्रियांकाची नक्कल करताना दिसतेय.

अभिनेत्री आलिया भट्टचा चुलबुला अंदाज अनेकांना आवडतो. तिचा खोडकरपणाचेही अनेक चाहते आहेत. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होतोय जो तिच्या चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस पडलाय. या व्हिडिओमध्ये आलिया भट्ट बॉलीवूडच्या टॉपच्या अभिनेत्रींपैकी एक असणा-या दीपिका पदूकोण आणि प्रियांका चोप्रा यांची स्टेजवर नक्कल करतेय. आलियाचा हा खोडकर अंदाज पाहून सलमान खान आणि रणवीर सिंह त्यांचं हसणं थांबवू शकत नाहीयेत आणि जीवतोडून हसत आहेत.

आलियाचा हा व्हिडिओ एका पुरस्कार सोहळ्यातील आहे. या सोहळ्यात ती स्टेजवर दीपिका आणि प्रियांका देत असलेल्या पोज विषयी सांगतेय. आलिया सांगते 'या पोज माझ्या सगळ्यात आवडत्या पोज आहेत. एक ही जी मी दीपिका मॅडमकडून शिकली आहे.' असं म्हणत ती दीपिकाची पोज दाखवते जे पाहून रणवीर सिंह जोरजोरात हसायला लागतो. आणि त्यानंतर ती म्हणते की 'ही दुसरी पोज जी मी प्रियांका कडून शिकली आहे' आणि पुन्हा ती त्याचप्रकारे प्रियांकाची पोज दाखवते जे पाहून सलमान खान लोटपोट होतो. आलिया भट्टचा हा व्हिडिओ तिच्या फॅनपेजने इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला आहे जो सगळ्यांच लक्ष वेधून घेत आहे. 

आलियाच्या सिनेमांच्या बाबतीत बोलायचं झालं तर ती लवकरंच 'सडक २' या सिनेमात दिसणार आहे. महेश भट्ट दिग्दर्शित या सिनेमात आलियासोबत संजय दत्त, आदित्य रॉय कपूर आणि मोठी बहीण पूजा भट्ट मुख्य भूमिकेत आहेत. या सिनेमामुळे आलिया पहिल्यांदाच  तिचे वडिल महेश भट्ट आणि बहीण पूजा भट्टसोबत एकत्र काम करणार आहे. याशिवाय आलिया 'ब्रह्मास्त्र' सिनेमात देखील झळकणार आहे. यात ती रणबीर कपूरसोबत दिसेल.   

alia bhatt imitate priyanka chopra and deepika padukone salman khan laugh at it video  

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024: निवडणुकीदरम्यान 8,889 कोटींची रोकड, 4,000 कोटींचं ड्रग्ज जप्त! निवडणूक आयोगाची माहिती

IPL 2024 RCB vs CSK Live Score: चेन्नईला दुसरा धक्का! कर्णधारापाठोपाठ डॅरिल मिचेलही आऊट

Lok Sabha Election 2024 : रायबरेली, अमेठीत प्रचाराचा धडाका! राहुल गांधी विरुद्ध ‘स्थानिक’ असा तडका

Video: अत्यंत संतापजनक! भर बाजारात अल्पवयीन मुलीसोबत अश्लील वर्तन; व्हिडिओ पाहून तुम्हालाही येईल राग!

RCB vs CSK: सँटेनरनं बॉलला स्पर्श केला अन् डू प्लेसिस रनआऊट झाला, पण विकेट अडकली वादाच्या भोवऱ्यात

SCROLL FOR NEXT