Alia bhatt-Neetu Singh
Alia bhatt-Neetu Singh  Sakal
मनोरंजन

आलिया अन् नीतू सिंग; जाणून घ्या सासू-सूनेची गोड नात्यामागची स्टोरी

सकाळ डिजिटल टीम

सासू-सून या नात्याकडे बऱ्याचदा नकारात्मक दृष्टीकोनातून पाहिले जाते. परंतु अलीकडे परिस्थिती खूपच बदलली आहे. अलीकडे अनेक सासू-सूनांमध्ये मैत्रीचे,आदराचे संबंध पाहायला मिळतात. विवाहानंतर फक्त पती-पत्नीत प्रेम असून उपयोग नाही, तर त्याच्या कुटूंबियांशीदेखील तितकेच सामंजस्याचं नातं असायला हवं. खासकरून सासू आणि सूनेचं नातंही तितकंच सामंजस्याचं असणं महत्त्वाचं आहे. काल आलिया भट्ट आणि रणबीर कपूरचं लग्न झालं. पण आलियानं खूप आधीपासूनच रणबीरची आई नीतू सिंगशी चांगलं नातं जोपासलं आहे. सासू-सूनेच्या नात्यात जिव्हाळा वाढीस येण्यासाठी कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, हे आज आपण पाहणार आहोत. (Alia Bhatt marries Ranbir Kapoor; Neetu Singh Relationship between alia and neetu singh)

1. एकत्र वेळ घालवा-

सासू-सूनेतील नातं अधिक दृढ होण्यासाठी एकमेकांसोबत वेळ घालवणे खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही एकत्र कॉफी घ्या किंवा सासूच्या आवडत्या गोष्टी करून पहा. चौकटीच्या बाहेर विचार करण्यास मोकळे रहा आणि नवीन कल्पनांचा प्रयोग करा. आलिया आणि नीतूचे अनेक फोटो तुम्हा पाहिले असतील. वाढदिवसाच्या माफक समारंभाला घरी उपस्थित राहण्यापासून ते इतर कार्यक्रमांत सासूसोबत वेळ घालवल्याने सासू खूश होऊ शकेल.

2. एकमेकांचा आदर करा-

तुमच्या सासूला तुमच्या जीवनात सामील करून घेणे, महत्त्वाचं आहे. कौटुंबिक कार्यक्रम, सुट्ट्या, सहली आणि इतर सर्व गोष्टींमध्ये तिला समाविष्ट करा. तिच्यासाठी तुम्ही वेळ काढू शकता. सणासुदीच्या वेळी सासूसाठी खरेदी करण्याइतकी साधी गोष्टसुद्धा तिला खूप आनंदी करू शकते. गंगूबाई काठियावाडीचा ट्रेलर आल्यानंतर आलियाचे अभिनंदन करणाऱ्यांमध्ये नीतूही होती. नीतू कपूरने तिच्या इंस्टाग्राम कथांचा वापर तिची भावी सून आलिया भट्टच्या अभिनय क्षमतेची प्रशंसा करण्यासाठी केला. (Ranbir Kapoor marries Alia Bhatt in Mumbai)

3. सहभागी व्हा, विश्वासार्हता वाढवा आणि संपर्कात रहा-

विश्वास, मोकळेपणा आणि प्रभावी संवाद हा नात्यात सलोखा टिकवण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. जेव्हा गरज असेल तेव्हा साथ आणि पाठींबा देण्यासाठी उपलब्ध असावं. तुमची सून तुमच्याकडे ती विसंबून राहू शकते अशी व्यक्ती म्हणून पाहते. नीतू सिंगने नेहमीच आपल्या सुनेचे कौतुक केले आहे. नीतू कपूरने एकदा तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर आलियाची एक न पाहिलेली इमेज शेअर केली होती आणि अभिनेत्रीला "आतून सर्वात सुंदर व्यक्ती" म्हटले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sonia Gandhi : ''माझं लेकरु तुम्हाला सोपवत आहे... तो तुम्हाला निराश करणार नाही'', सोनिया गांधी भावुक

Lok Sabha Election 2024 : ‘ते’ राममंदिरावर बुलडोझर घालतील; पंतप्रधान मोदींची ‘सप’, ‘काँग्रेस’वर टीका

Parveen Hooda : ऑलिम्पिकपूर्वी भारताला मोठा धक्का; परवीन हुड्डा पॅरिस ऑलिम्पिक कोटा गमावणार?

Arvind Kejriwal: ईडीच्या कारवाईबाबत केजरीवालांचं पुढे काय होणार? सुप्रीम कोर्टानं राखून ठेवला निकाल

Shashank & Gashmeer : शशांक-गश्मीरची पुन्हा जमली जोडी; 'या' प्रोजेक्टमध्ये करणार एकत्र काम

SCROLL FOR NEXT