Viral Video: एवढं महत्वाचं आहे का फोनवर बोलणं? पाहा काय घडलंय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Viral Video

Viral Video: एवढं महत्वाचं आहे का फोनवर बोलणं? पाहा काय घडलंय

आपण कधीकधी आपल्या कामात एवढं गुंतून जातो की, आपल्या भोवती काय घडतंय हेही आपल्या लक्षात राहत नाही. काही वेळा लोकं चालता चालता मोबाईलमध्ये व्यस्त असतात पण त्यांना आपण कुठं चाललोय हेही लक्षात राहत नाही. असे अनेक व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. एक मुलगी फोनवर बोलत असताना वरुन ट्रेन जात आहे आणि ट्रेन निघून गेल्यावरही ती फोनवर बोलत असल्याचं आपल्याला दिसतंय.

दरम्यान हा व्हिडीओ खरा आहे की खोटा? फक्त दाखवण्यासाठी शूट केलाय का? अशा कोणत्याच प्रकारची माहिती अजून मिळाली नसून ही मुलगी रेल्वेच्या प्लॅटफॉर्मच्या जवळ असलेल्या रुळावर झोपलेली दिसत आहे. रेल्वे वरुन गेल्यावर ती उठत आहे. तरी ती फोनवर बोलत आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत असून त्यावर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया उमटताना आपल्याला दिसत आहेत.

हेही वाचा: सदावर्तेंना न्यायालयाचा दणका, चार दिवसांची पोलिस कोठडी

काही लोकं या व्हिडीओवर सदर मुलीला सल्ला देताना दिसत असून काही लोकं हा लोकप्रिय होण्यासाठी केलेला स्टंट आहे अशा प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. तर काहीजण आपल्या जीवापेक्षा फोनवर बोलणं जास्त महत्त्वाचं आहे का असा प्रश्न उपस्थित करताना पाहायला मिळत आहेत.

दरम्यान हा व्हिडीओ खरा आहे का? ही मुलगी रुळावर कोणत्या कारणासाठी गेली होती याची अधिकृत माहिती मिळाली नाही.

Web Title: Railway Track Girl Talking On Phone Viral Video

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Entertainmentviralrailway
go to top