Alia Bhatt esakal
मनोरंजन

Alia Bhatt: "काय पण फेकू नकोस..."; आलियानं शेअर केलेल्या 'त्या' फोटोवर कमेंट्सचा पाऊस

अभिनेत्री आलिया भट्टने (Alia Bhatt) खास फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. या फोटोवर आता नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

priyanka kulkarni

Alia Bhatt: काल (8 मार्च) रोजी जगभरात आंतरराष्ट्रीय महिला दिन (International Women's Day) साजरा करण्यात आला. काही बॉलिवूड सेलिब्रिटींनी व्हिडीओ आणि फोटो पोस्ट करुन महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. अभिनेत्री आलिया भट्टने (Alia Bhatt) देखील खास फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. या फोटोवर आता नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

आलियाची पोस्ट

आलियानं हार्ट शेपच्या सॉफ्ट टॉयचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोला तिनं कॅप्शन दिलं, "माझ्या लहान वुमननं हे माझ्यासाठी बनवले आहे आणि मी हे तुम्हा सर्वांसोबत शेअर करत आहे. महिला दिनाच्या शुभेच्छा. " आलियानं कॅप्शनमध्ये 'माझ्या लहान वुमननं हे माझ्यासाठी बनवले', असं लिहिल्यानं नेटकऱ्यांनी असा अंदाज लावला ही ते सॉफ्ट टॉय राहानं तयार केलं आहे. राहा ही इतक्या कमी वयात सॉफ्ट टॉय कसं बनवू शकते?, असा प्रश्न आता नेटकऱ्यांनी उपस्थित केला आहे.

नेटकऱ्यांच्या कमेंट्स

एका नेटकऱ्यानं आलियाच्या पोस्टला कमेंट केली, "राहाला शिववणकाम येतं? मला कोणीतरी हे सांगा की,दोन वर्षाची मुलगी हे कसं बनवू शकते?" तर दुसऱ्या युझरनं आलियाच्या फोटोला कमेंट केली, "एवढी छोटी मुलगी हे कसं बनवू शकते? काही पण फेकू नकोस"

Alia Bhatt

रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांची मुलगी राहा ही 6 नोव्हेंबर 2023 रोजी एक वर्षाची झाली. 25 डिसेंबर 2023 रोजी आलिया आणि रणबीरनं राहाचा चेहरा पहिल्यांदा पापाराझीला दाखवला.आलिया भट्टने काही दिवसांपूर्वी राहासोबतचा फोटो शेअर केला. या फोटोमध्ये आलिया आणि राहा यांनी ट्विनिंग केलेलं दिसत आहे.

आलियाचे चित्रपट

गेल्या वर्षी आलियाचा रॉकी और रानी की प्रेम कहानी हा चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. आता आलिया ही जिगरा या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs AUSW Live: भारतीय संघाचे T20 World Cup मधून पॅकअप! ऑस्ट्रेलियाचा दणदणीत विजय अन् दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीत... हरमनप्रीत कौरच्या संघाला अपयश

IND vs IRE 2nd T20I : आयर्लंडने इतिहास रचला! भारतीय संघाला ट्वेंटी-२० मालिकेत नमवले, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाची लाजीरवाणी सुरुवात

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर वाढला मृत्यूचा धोका! टोल टाळण्यासाठी 'नो-एंट्री'तून वाहनांची सर्रास एंट्री; नियमांना हरताळ

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Vidarbha Rain Alert : विदर्भासाठी दिलासादायक बातमी! पावसाचा जोर वाढणार, ११ जिल्हे यलो अलर्टवर

SCROLL FOR NEXT