मनोरंजन

Alia Bhatt : 'आता आलियाच्या हाती लेदरची बॅग कशी चालते', 'Poacher' सीरिजच्या निर्मातीवर नेटकरी का संतापले?

आलियाच्या हाती जी बॅग होती त्यामुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आल्याचे सांगण्यात येत आहे.

युगंधर ताजणे

Alia Bhatt News: बॉलीवूडची आघाडीची अभिनेत्री आलिया भट्ट ही आता वेगळ्याच कारणामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. यावेळी ती एका ब्रँडसोबत जोडली गेल्यानं तिला वादाला सामोरं जावं लागलं आहे. मुंबईतील एका इव्हेंटमध्ये स्पॉट झाली. तिचे काही फोटो व्हायरल झाले आणि तिच्यावर नेटकऱ्यांनी टीका करण्यास सुरुवात केली.

खरं तर त्या इव्हेंटला बाकीचेही सेलिब्रेटी गेले होते. मात्र त्यात केवळ आलियाच टार्गेट करण्यात आले. याचे कारण तिच्या हाती असलेली पर्स. आलियाला काही जणांनी नाटकी अशीही कमेंट केली आहे. या सगळ्यात आलिया का ट्रोल झाली, तिच्यावर नेटकऱ्यांनी आक्षेप घेण्यास का सुरुवात केली, याविषयी आपण जाणून घेणार आहोत.

त्याचं झालं असं की, आलियानं पोचर नावाच्या वेबसीरिजची निर्मिती केली आहे. त्या मालिकेची मुख्य निर्माती म्हणून तिचं नाव आहे. ही मालिका हत्तींच्या सुळ्यांची तस्करी आणि त्याचा व्यापार यावर आधारित आहे. हत्तींची अमानुषपणे होणारी हत्या, आलिया एका इव्हेंटमध्ये गेली होती. त्यात तिच्या हाती जी पर्स होती त्याची किंमत २८०० डॉलर आहे. असं बोललं जातं की, ती पर्स कातड्याची आहे.

नेटकऱ्यांना ज्यावेळी त्या पर्सविषयी कळले तेव्हा त्यांनी आलियाला ट्रोल करण्यास सुरुवात केली. त्यांनी आलियाला नाटकी असं म्हटलं आहे. इटालियन लक्झरी ब्रँडच्यावतीनं आलिया त्या कार्यक्रमात सहभागी झाली होती. तिथं काही नेटकऱ्यांनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला तर दुसरीकडे तिला तिच्या पर्सविषयी विचारणाही केली आहे.

याचं दुसरं कारण म्हणजे आलियानं तिची पोचर नावाची मालिका प्रदर्शित झाल्यानंतर तो फोटो शेयर केला. ज्या मालिकेतून प्राण्यांच्या अवैध हत्येवर प्रकाशझोत टाकण्यात आला होता. त्या मालिकेच्या निर्मातीनं प्राण्यांच्या कातड्याच्या पर्स वापरणं कितपत योग्य, असा प्रश्न नेटकऱ्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

पोचरच्या ट्रेलर रिलिजच्या इव्हेंटच्यावेळी आलियानं तिच्या मनोगतात म्हटले होते की, मला या सीरिजच्या निमित्तानं कळलं, हत्तींना किती निघृणपणे मारण्यात आले आहे.त्यांची हत्या करण्यात आली आहे. वास्तविक घटनांवर आधारित ही मालिका प्रेक्षकांसाठी वेगळा अनुभव ठरणार आहे.असेही आलियानं म्हटले आहे. अॅमेझॉन प्राईमवर ही मालिका फेब्रुवारीच्या २३ तारखेला प्रदर्शित होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs AUSW Live: भारतीय संघाचे T20 World Cup मधून पॅकअप! ऑस्ट्रेलियाचा दणदणीत विजय अन् दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीत... हरमनप्रीत कौरच्या संघाला अपयश

IND vs IRE 2nd T20I : आयर्लंडने इतिहास रचला! भारतीय संघाला ट्वेंटी-२० मालिकेत नमवले, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाची लाजीरवाणी सुरुवात

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर वाढला मृत्यूचा धोका! टोल टाळण्यासाठी 'नो-एंट्री'तून वाहनांची सर्रास एंट्री; नियमांना हरताळ

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Vidarbha Rain Alert : विदर्भासाठी दिलासादायक बातमी! पावसाचा जोर वाढणार, ११ जिल्हे यलो अलर्टवर

SCROLL FOR NEXT