alia bhat, ranbir kapoor, dadasaheb phalke awards 2023 SAKAL
मनोरंजन

Dadasaheb Phalke Awards 2023: राहाचा पायगुण.. आलिया-रणबीर ठरले दादासाहेब फाळके पुरस्काराचे मानकरी!

आलिया भट आणि रणबीर कपूर या नवरा बायकोने दादासाहेब फाळके पुरस्कार पटकावला

Devendra Jadhav

Alia Bhat - Ranbir Kapoor News: २०२३ च्या दादासाहेब फाळके पुरस्करांची घोषणा झाली. या पुरस्कार सोहळ्यात आलिया भट आणि रणबीर कपूर या नवरा बायकोने दादासाहेब फाळके पुरस्कार पटकावला आहे.

आलियाला गंगुबाई काठियावाडी सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून सन्मानित करण्यात आले तर रणबीरला ब्रम्हास्त्र सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून पुरस्कार मिळाला. रणबीर या सोहळ्याला गैरहजर होता म्हणून त्याच्या वतीने आलीयाने हा पुरस्कार स्वीकारला.

(Alia-Ranbir became the winners of the Dadasaheb Phalke Award 2023)

दादासाहेब फाळके पुरस्कार सोहळ्यात आलिया भटला रेखा शुभेच्छा देताना आणि तिच्याशी बोलताना दिसत आहे.

रेड कार्पेटवर एकत्र येऊन पापाराझींसाठी पोज देताना त्या दोघी हसत आहेत. रेखाने आलिया भट्टच्या गालावर एक पप्पी घेतली आणि हा क्षण खूपच गोंडस आहे!

रेखा एका पांढऱ्या आणि सोनेरी रंगाच्या साडीत, मॅचिंग ब्लाउजसह अतिशय सुंदर दिसत होती. रेखा कोणत्याही सोहळ्यात तिच्या खास साडीमुळे चर्चेत असते. याशिवाय रेखाच्या हातात असली पांढरी आणि सोनेरी पिशवी सुद्धा प्रचंड आकर्षक होती.

रेखाने सुंदर सोनेरी कानातले घातलेले. याशिवाय आलिया भट्ट चांदीच्या बॉर्डरसह संपूर्ण पांढर्‍या साडीत दिसत होती. दोघींची जोडी दादासाहेब फाळके पुरस्कार सोहळ्यात प्रचंड चर्चेत होती.

आलिया भट्ट, रेखा, वरुण धवन, अनुपम खेर, विवेक अग्निहोत्री, ऋषभ शेट्टी, रोनित रॉय, श्रेयस तळपदे, आर बाल्की आणि इतर सेलिब्रिटी या पुरस्कार सोहळ्यात सहभागी होते. रणबीर कपूर सध्या ऍनिमल सिनेमाचं शूटिंग करत असल्याने उपस्थित राहू शकला नाही.

त्याच्या वतीने आलिया भटने पुरस्कार स्वीकारला. आलीया आणि रणबीरने काही दिवसांपूर्वी मुलगी राहाला जन्म दिला. त्यामुळे नवरा बायकोला पुरस्कार मिळण्यात कुठेतरी राहाच्या पायगुण आहे अशी चर्चा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Best Election Results: ठाकरे ब्रँडला एकटे प्रसाद लाड कसे ठरले वरचढ? मुंबईतल्या 'बेस्ट'च्या निवडणुकीचा निकाल

Stock Market Closing: शेअर बाजार 3 आठवड्यांच्या उच्चांकावर बंद; आयटी आणि एफएमसीजीमध्ये मोठी वाढ

बॉलिवूडचा एक असा खलनायक ज्याच्यामुळे अमिताभ बच्चन झाले सुपरस्टार ! त्याचा मृत्यू अखेरपर्यंत रहस्यच राहिला

Who Is Shashank Rao : बेस्ट निवडणुकीत ठाकरे बंधुंना शह देणारे शशांक राव कोण? कशी केली कमाल?

Rain-Maharashtra Latest Live News Update: नांदेडमध्ये पुरामुळे लाखो हेक्टर वरील शेती पिकांचे नुकसान

SCROLL FOR NEXT