
HSC Exam 2023: मित्रांनो.. Shah Rukh Khan चे प्रेरणादायी शब्द ऐका, पेपर आणखी चांगला जाईल
Shah Rukh Khan All The Best To HSC studenets: शाहरुख खान कायम त्याच्या सिनेमांमधून आपल्या फॅन्सना प्रेरणा देत असतो. वयाच्या ५७ व्या वर्षी शाहरुख खानने पठाण मध्ये दमदार ऍक्शन करून सर्वांनाच चकित केलं.
शाहरुख खानने नुकतंच १० वी आणि १२ वीच्या विद्यार्थ्यांना All The Best देताना फार चांगले शब्द वापरले आहेत. शाहरुख खानचे हे शब्द ऐकून १०, १२ वीच्या विद्यार्थ्यांचा पेपर आणखी चांगला जाईल.
(HSC students listen to Shah Rukh Khan's motivational words before board exam)
शाहरुख खान ट्विटरवर #askSRK च्या माध्यमातून त्याच्या फॅन्सशी संवाद साधत आहे. या माध्यमातून शाहरुख खान त्याच्या फॅन्सशी दिलखुलास संवाद साधतोय.
अशातच एका फॅनने शाहरुखला, "शाहरुख सर.. 10वी आणि 12वी च्या विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारे काही सांगा.. येत्या काही आठवड्यात हे विद्यार्थी बोर्डाच्या परीक्षेला सामोरे जातील.."
या प्रश्नाला उत्तर देताना शाहरुख म्हणाला, जमेल तेवढा अभ्यास करा. अजिबात टेन्शन घेऊ नका. शाळेच्या मार्च पास्टमध्ये मी एक फलक घेऊन जायचो...'तुमचे सर्वोत्तम करा आणि बाकीचे सोडून द्या' फक्त कसलाही ताण घेऊ नका. ऑल द बेस्ट.." अशा शब्दात शाहरुखने १० वी आणि १२ विच्या विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली आहे
आजपासून राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणारी बारावी बोर्ड परीक्षेला सुरुवात झाली आहे.
१२वीची लेखी आजपासून सुरू होऊन २१ मार्च पर्यंत पार पडेल. तब्बल १४ लाख ५७ हजार २९३ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. ही गेल्या ५ वर्षातली सर्वाधिक संख्या आहे.
शाहरुख खानच्या पठाण सिनेमाने बॉक्स ऑफिसवर विक्रमी कामगिरी केली. पठाण निमित्ताने ४ वर्षांनंतर हिंदी इंडस्ट्रीत कमबॅक केलंय. शाहरुखच्या पठाण सिनेमाचं अनेक कलाकार तोंड भरून कौतुक करत आहेत.
२५ जानेवारीला रीलीज झालेला पठाण शाहरुख खानच्या करीयरमधला अत्यंत महत्वाचा सिनेमा आहे. आता शाहरुख खान जवान आणि डंकी या आगामी सिनेमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करणार आहे.