Ameen Sayani And Amitabh Bachchan esakal
मनोरंजन

Ameen Sayani-Amitabh Bachchan : खरचं अमिताभ बच्चन यांना अमीन यांनी 'रिजेक्ट' केले होते? सयानींनीच केला होता मोठा खुलासा!

अमीन सयांनी (Ameen Sayani News) यांनी त्यांच्या एका मुलाखतीमध्ये बिग बी अमिताभ बच्चन यांच्याविषयीच्या त्या आठवणींना उजाळा दिला होता.

युगंधर ताजणे, सकाळ ऑनलाईन टीम

Ameen Sayani Death: आपल्या जादुई आवाजानं गेल्या चार दशकांहून अधिक काळ श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणाऱ्या अमीन सयानी यांनी अखेर वयाच्या ९१ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. हदयविकाराच्या धक्क्यानं त्यांची प्राणज्योत मालवली. सयानी यांच्याविषयी नेहमीच वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या जातात. त्यात त्यांची अन् बिग बी अमिताभ बच्चन यांच्या मुलाखतीची ती गोष्ट विशेष लोकप्रिय आहे.

अमीन सयानी यांनी त्या गोष्टीविषयी मुलाखतीमध्ये सांगितले होते. अमिताभ यांनी जेव्हा त्यांना रेडिओवरील मुलाखतीमध्ये नकार मिळाला असे सांगितले तेव्हा मलाही धक्का बसला होता. त्यावेळी मी सिलोन रेडिओवर कामाला होतो. तेव्हा घराघरात सिलोन रेडिओ ऐकला जात होता. त्यामुळे अमिताभ कुणाविषयी बोलत आहेत हे कळायला मला वेळ लागला नाही. मात्र बऱ्याच वर्षांनी तो प्रसंग विस्मरणात गेला असे सयानी म्हणाले.

अमीन यांनी सांगितलं सत्य...

मी अमिताभ यांचा आनंद नावाचा चित्रपट पाहिला होता. त्यातील त्यांचा आवाज आणि अभिनय मला कमालीचा आवडला होता. त्याचवेळी मी असे ठरवले की मी स्वता त्यांच्या चित्रपटांचे प्रमोशन करणार. मात्र तेव्हा मला जाणवले की, त्यांना माझ्या आवाजाची काहीही गरज नव्हती. त्यांचा आवाजच त्यांची वेगळी ओळख होती. त्यावेळी अमिताभ हे जया बच्चन यांना डेट करत होती. त्यांची लोकप्रियता प्रचंड होती.

पुढे काही वर्षांनी मी अमिताभ यांना रेडिओ अँड टेलिव्हिजन अॅडव्हरटायझिंग प्रॅक्टिर्शनस असोशिएशन (आरएपीए) च्या पुरस्कार सोहळ्यात प्रमुख पाहूणा म्हणून निमंत्रित केले होते. त्यावेळी त्यांनी त्या कार्यक्रमामध्ये भाषण करताना आपल्याला कशाप्रकारे ऑडिशन न देता रिजेक्ट केले होते याबद्दल सांगितले. त्यानंतर त्यांनी अभिनयाची वाट धरली. नाही तर आज ते ब्रॉडकास्टर म्हणून लोकांना परिचित असते.

तसं असतं तर...

अमीन सयानी यांनी त्या मुलाखतीमध्ये सांगितले होते की, त्या शो नंतर मी माझी पत्नी रमा आम्ही रेडिओ सिलोनमध्ये सोबत काम करतो होतो. तिला विचारले की, अमिताभ बच्चन नेमकं कशाविषयी बोलत आहेत, कारण त्यावेळी मला आठवत नाही की मी कधी त्यांना भेटलो होतो म्हणून. मला रमानं सांगितलं की, तुम्हाला भेटायला एक व्यक्ती आली होती. तेव्हा मला आठवले की, मागे एकदा माझ्या सेक्रेटरीनं मला सांगितले होते की, मला भेटायला अमिताभ बच्चन नावाचा कुणी व्यक्ती आला होता.

मी तेव्हा सेक्रेटरीला सांगितले होते की, माझी अपॉइमेंट घेऊन मला भेटायला या, असे त्यांना सांगा. जेव्हा ते दुसऱ्यांदा मला भेटायला आले तेव्हा त्यांनी अपॉइमेंट घेतली नव्हती. मी तेव्हाही त्यांची माफी मागून त्यांना भेट दिली नव्हती. कारण माझ्याकडे त्यांना भेटण्यासाठी वेळ नव्हता. असे अमीन यांनी आज तकला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये सांगितले होते.

जाऊ देत, जे झालं ते चांगलचं झालं. जर मी त्यांची भेट घेतली असती किंवा त्यांच्याशी बोललो असतो, किंवा मला त्यांचा आवाज चांगला वाटला असता तर मी त्यांना काम दिले असते, आणि माझे सगळे क्लायंटस त्यांच्याकडे गेले असते आणि मीच रस्त्यावर आलो असतो. दुसरीकडे जगाला महानायक मिळाला नसता. अशा शब्दांत अमीन यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Home Loan Interest Rate: एसबीआयनंतर 'या' बँकेचाही झटका! गृहकर्जाचे दर वाढले, सामान्यांना दिलासा नाही

माेठी बातमी! 'राज्यामध्ये दीड कोटी लाभार्थींचे धान्य बंद'; ई-केवायसीअभावी पुरवठा विभागाकडून कारवाई

Child Marriage : महाराष्ट्रात पुन्हा बालविवाह! कायद्याला चुकवून अल्पवयीन मुलीचं लग्न अन् अत्याचार, सात महिन्यांची गर्भवती

Vice President Election : NDA चा ‘राजकीय डाव’! उपराष्ट्रपतीपदासाठी सी. पी. राधाकृष्णन यांना उमेदवारी, सध्या आहेत महाराष्ट्राचे राज्यपाल

Shashikant Shinde: शासनाने ओला दुष्काळ जाहीर करावा : प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे; 'शेतकऱ्यांसाठी दोन दिवसाचे विशेष अधिवेशन बोलवावे'

SCROLL FOR NEXT